Majhi Ladki Bahin Yojana :...तर तुमचा अर्ज अपात्र ठरणार? हमीपत्रातील ‘ती’ अट आताच वाचून घ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

mukhymantri majhi ladki bahin yojana hamipatra self certificate clause read carefully fourth point is important
अर्जदार महिलांना एक हमीपत्रही द्यावे लागणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अर्जदार महिलांना एक हमीपत्रही द्यावे लागणार आहे.

point

हमीपत्रातील चौथी अट महिलांनी लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

point

चौथ्या अटीत नेमके असं काय आहे?

Majhi Ladki Bahin Yojana,Self Certificate : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला, मुलींनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान अर्जदार महिलांना एक हमीपत्रही (Self Certificate) द्यावे लागणार आहे. या हमीपत्रातील चौथी अट महिलांनी लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. यामागचे कारण काय आहे? आणि चौथ्या अटीत नेमके असं काय आहे? हे जाणून घेऊयात.  (mukhymantri majhi ladki bahin yojana hamipatra self certificate clause read carefully fourth point is important) 

हमीपत्र म्हणजेच सेल्फ सर्टीफिकेट, या हमीपत्रावर 10 मुद्दे देण्यात आले आहे. महिलांनी हे 10 हि मुद्दे व्यवस्थित वाचून डाव्या बाजूच्या चौकोनावर बरोबरची खून करायची आहे. तसेच हे 10 मुद्दे भरून झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात सही करायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या हमीपत्राचा फोटो काढून तो नारीशक्ती दूत अॅपमधील अर्जदाराच्या हमीपत्राच्या कॉलममध्ये अपलोड करायचा आहे. 

हे ही वाचा : Pune Accident : भरधाव कारने जोडप्याला उडवलं, थरकाप उडवणारा व्हिडिओ

चौथ्या अटीचा नेमका अर्थ काय? 

या हमीपत्रात प्रत्यके घोषणेची (अट) सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या हमीपत्रातील चौथी अट खूप महत्वाची आहे. कारण या अटीत घरातील व्यक्ती कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, असे विचारण्यात आले आहे. जर नसेल तर तुम्हाला बरोबरची खून करायची आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी स्वत: किंवा माझ्या कटुंबातील सदस्य नियमीत/ कायम/ कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत," असे हमीपत्राच्या चौथ्या स्वयंघोषणेत लिहिलेले आहे. त्यामुळे एखाद्या महिलेच्या कुटंबात एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्या महिलेला माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही.

खात्यात पैसै कधी जमा होणार?

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पहिला हफ्ता जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Mohammad Shami : सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडलं मौन

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, उत्पन्न दाखला नसेल, तर पिवळे वा केशरी रेशन कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT