Mumbai Rain Update : मुंबईला 'ऑरेंज अलर्ट'; 'या' जिल्ह्यांना 'अति मुसळधार'चा इशारा!
Mumbai Rain Update : मुंबईच्या अनेक भागत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. तर ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली सारख्या भागात देखील पावसाला दमदार सुरूवात झाली आहे. ज्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ज्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी पुढील 24 तास महत्वाचे असणार आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Rain Update : मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरायला सुरुवात केली आहे. आज सकाळपासुन मुंबईसह (Mumbai Rain) उपनगर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.ज्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने (IMD)मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला केला आहे. तर इतर जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा (Heavy Rain fall) अंदाज वर्तवण्यात आला आहे. (mumbai rain news heavy rain in next few hours imd alert mumbai thane palghar raigad rain alert waterlogged in kalyan) thane
ADVERTISEMENT
मुंबईच्या अनेक भागत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. तर ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली सारख्या भागात देखील पावसाला दमदार सुरूवात झाली आहे. ज्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ज्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, या दरम्यान ताशी 5 ते 15 मिमी पर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे. हा इशारा पुढील 10 तासापर्यंत असणार आहे.
भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी मागील 24 तासात सकाळी 9.45 वाजेपर्यंत पश्चिम उपनगरांमध्ये 150 मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आणि इतर भागात हलक्या आणि मध्यम सरीचा पाऊस पडला आहे. तसेच ठाण्यात अजूनही मुसळधार पाऊस सूरू आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Ramdas Kadam : 'शिवसेनेला 100 जागा द्या', रामदास कदमांची भाजपकडे मागणी
मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर काही पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिले आहे. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील पुढील काही तासांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Ramdas Kadam : "शिंदे साहेब, मोदी-शाहांना सांगा", कदमांनी भाजपवरच फोडले खापर
कल्याणच्या पिसवली गावात 250 घरात पाणी शिरलं
कल्याण डोंबिवलीत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे.या पावसामुळे पिसवली गावातील दोनशे लोकांची अडीचशे घरे पाण्याखाली गेली आहेत. या गावातील नाल्याच्या प्रवाहाशी संबंधित विकासकामांमुळे ही परिस्थिती झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. याबाबत अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे, मात्र पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान ठाणे आणि भिवंडी सारख्या भागात बाजारात देखील पाणी साचले आहेत. त्यामुळे अनेक नागरीकांची मोठी अडचण झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT