Mumbai Local Train : मुंबईत मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे.

point

मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

point

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिराने आहे.

मुंबई : Mumbai Weather Update: मुंबई शहर आणि उपनगात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. गुरूवारी (11 जुलै) दिवसभर पावसाने अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावलेली असताना आज (12 जुलै) सकाळपासून पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. (Mumbai Weather Update rain affected local trains meteorological department weather forecast 12th july 2024 )

मुसळधार ते अतिमुसळधार... मुंबईत कसे असणार हवामान?

आज पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत. दादर, लालबाग, परेल, हिंदमाता, चर्चगेट, सीएसटी या भागात सध्या पावसाचा प्रचंड जोर आहे. मुंबई शहरासह उपनगरातही पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. अंधेरी, वांद्रे, सांताक्रुझ, खार, मालाड या भागात दमदार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

हेही वाचा : Vidhan Parishad Election: कोणासोबत होणार दगाफटका? आमदारांची मतं कोणाला बनवणारं आमदार?

लोकलचे अपडेट काय?

सध्या कामाला निघालेल्या प्रवाशांचे टेन्शन वाढले आहे. पावसाचा फटका लोकला बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटांनी उशिराने आहे. रूळावर पाणी साचल्याची परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. सोमवारी (8 जुलै) मुंबईत निर्माण झालेली भयानक परिस्थिती आता पुन्हा निर्माण होईल का? अशी भिती सध्या नागरिकांना आहे. यावेळी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसंच, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक देखील पूर्णपणे विस्कळीत करण्यात आली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Vidhan Parishad Election : 'ती' तीन मतं कुणाचा करणार गेम?

आज शुक्रवारी मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.  काल रात्रीपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाचा आज पहाटे जोर वाढला याचा फटका हार्बर लाइनवरील वाहतुकीलाही बसल्याचे समजत आहे.

हेही वाचा : Pooja Khedkar: IAS पूजा खेडकरांचं ते WhatsApp चॅटच आलं समोर, नेमकं काय आहे यात?

हार्बर लाइनवरील वाहतूक देखील विस्कळीत झाल्याची माहिती आहे. येथील लोकल ट्रेनही 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. याचबरोबर मुंबईकरांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे असा सल्ला भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.

ADVERTISEMENT

  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT