Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले...,अंजनेरी गडावर भयंकर थरार

मुंबई तक

ADVERTISEMENT

nashik news tourist stuck in anjaneri fort how they rescue shocking story
ाशिकच्या अंजनेरी गडावर पर्यटक अडकल्याची घटना घडली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाशिकच्या अंजनेरी गडावर पर्यटक अडकल्याची घटना

point

अचानक पावसाचा जोर वाढल्याने पर्यटक अडकले

point

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली सुटका

Nashik News, Anjaneri fort : (दिपेश त्रिपाठी ):  राज्यात सध्या पावसाचा जोर चांगलात वाढला आहे. या पावसामुळे धरणे, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक पर्यटनस्थळावर गर्दी करत आहेत. या दरम्यान अनेक अपघाताच्या घटना देखील घडताना दिसत आहे. त्यात आता नाशिकच्या अंजनेरी गडावर (Anjaneri fort) पर्यटक अडकल्याची घटना घडली आहे. पावसाचा जोर (Maharashtra Rain) वाढल्याने तब्बल 10 पर्यटक गडावर अडकले होते. या पर्यटकांसाठी सहा तास रेस्क्यू ऑपरेशन राबवल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात यश आलं आहे. (nashik news tourist stuck in anjaneri fort how they rescue shocking story)  

काल रविवार असल्याने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक अंजनेरी गडावर पर्यटनासाठी पोहोचले होते. या दरम्यान अचानक दुपारी पावसाचा जोर वाढल्याने अंजनेरी गडावर अनेक पर्यटक अडकल्याची घटना घडली होती. नाशिकमध्ये रविवारी इतका पाऊस पडला होता की अंजनेरी गडावर ढगसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. गडाच्या पायऱ्यांवर वेगाने पावसाचे पाणी वाहत होता. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

हे ही वाचा : Chhagan Bhujbal : शरद पवारांची भेट का घेतली? भुजबळांनी अखेर कारण केले उघड

या अचानक आलेल्या पावसामुळे साधारण 10 च्या आसपास पर्यटक गडावर अडकले होते. या पर्यटकांना या पाण्यामुळे गडावरून खाली उतरताच येत नव्हते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी वनविभागाच्या टीमला पाचारण केले होते. यावेळी वनविभागाच्या टीमने तब्बल 6 तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून मानवी साखळी तयार करुन या पर्यटकांची सुटका केली आहे. या थरारक सुटकेनंतर पर्यटकांच्या जीवात जीव आला आहे. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे नाशिकमध्ये प्रशासनाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला होता.यानंतर देखील अनेक पर्यटक पर्यटनासाठी अंजनेरी गडावर पोहोचले होते. यावेळी अचानक वाढलेल्या पावसाने अंजनेरी गडाच्या पायऱ्यांवरून वेगाने पाणी ओसंडून वाहत होते. हे दृष्य पाहून पर्यटकांची घाबरगुंडी उडाली होती. मात्र वनविभागाने घटनास्थळी दाखल होऊन मानवी साखळीच्या सहाय्याने या पर्यटकांची सुटका केली होती. 

हे ही वाचा : IAS पूजा खेडकरांचे आई-वडील गायब; पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट!

अख्खं कुटुंब गेलं वाहून 

दरम्यान याआधी काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यातील भूशी डॅम परिसरात मोठी घडना घडली होती. भूशी डॅमवर अचानक पाणी वाढल्याने पाण्यात 9 ते 10 जण वाहून गेल्याची घटना घडली होती. यात 4 आणि 9 वर्षाच्या लहान मुलांचाही समावेश होता. 
ज्या कुटुंबासोबत ही दुर्दैवी घटना घडली, ते पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी डॅमवर आले होते. 

ADVERTISEMENT

लोणावळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले की, 30 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि कुटुंबातील 10 लोक वाहून गेले. त्यातील काही जण जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. एका मुलीला आणि इतर काही जणांना वाचवण्यात लोकांना यश आले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT