Video : पाण्याचा प्रवाह अचानक वाढला अन् धबधब्यात 50 जण अडकले? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

navi mumbai news, cbd belapur, cbd belapur waterfall, video viral
या रेस्क्यु ऑपरेशनचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बेलापूरच्या डोंगर रांगेतील धबधब्यात 50 पर्यटक अडकले.

point

पर्यटकांना मानवी साखळी करून वाचवण्यात आले.

point

रेस्क्यु ऑपरेशनचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल.

Navi Mumbai News : पावसाळा सुरू झाल्यापासून पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या दरम्यान अनेक पर्यटनस्थळी अनेक कुटुंब वाहून गेल्याच्या, अनेक पर्यंटक अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना पाहता प्रशासनाने अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव केला असला तरी पर्यंटक जीव धोक्यात घालत आहेत. आता अशीच घटना नवी मुंबईच्या बेलापूरमधून समोर आली आहे. बेलापूरच्या डोंगर रांगेतील धबधब्यात तब्बल 50 पर्यटक अडकल्याची घटना घडली होती. या पर्यटकांना आता मानवी साखळी करून वाचवण्यात आले आहे. या रेस्क्यु ऑपरेशनचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल. (navi mumbai news cbd belapur 50 tourists rescued video viral shocking story) 

ADVERTISEMENT

विकेंड असल्याने आज अनेकांनी पर्यंटनस्थळी गर्दी केली होती. बेलापूरच्या डोंगररांगेत असलेल्या धबधब्यावर देखील पर्यंटकांनी मोठी गर्दी केली होती. या दरम्यान मुसळधार पाऊस देखील सुरु असल्याने धबधब्यावर पाण्याचा प्रवाह वाढत होता. मात्र मजा मस्ती करण्यात दंग असलेल्या पर्यंटकांना काही कळण्याआधीच ते पाण्यात अडकल्याची घटना घडली होती. 

तब्बल 40 ते 50 पर्यंटक पाण्याच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली होती. पाण्याचा प्रवाह इतका वेगाने होता की एखादा पाण्यात गेला तर सापडणार देखील नाही, अशी परिस्थिती होती. या दरम्यान पर्यंटक अडकल्याची माहिती स्थानिकांना आणि अग्मिशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मानवी साखळी करून 50 पर्यटकांचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे या पर्यंटकांच्या जीवात जीव आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT