Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरांचा नवा प्रताप, MBBS प्रवेशासाठी केला होता मोठा झोल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pooja khedkar case update did obc quota misuse did not submit disability certificate for mbbs degree
ओबीसी भटक्या जमाती-3 कोट्यातून जागा त्यांनी मिळाल्याचा आरोप आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

point

ओबीसी कोट्याचा चुकीचा वापर केला.

point

ओबीसी भटक्या जमाती-3 कोट्यातून जागा मिळवल्याचा आरोप

Pooja Khedkar Case Update : ओंकार वाबळे, पुणे :  प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारनाम्याची मालिका संपता संपत नाही आहे. त्यात आता या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. पूजा खेडकर यांनी एमबीबीएसची पदवी मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने ओबीसी कोट्याचा वापर केल्याचा आरोप होत आहे. या आरोपानंतर आता पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.  (pooja khedkar case update did obc quota misuse did not submit disability certificate for mbbs degree) 

पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेमधून पूजा खेडकर यांनी 2007 साली एमबीबीएस पदवीसाठी प्रवेश घेतला होता. ओबीसी कोट्याचा चुकीचा वापर करून त्यांनी हा प्रवेश घेतल्याचा आरोप होत आहे. पूजा खेडकर यांनी ओबीसी भटक्या जमाती-3 कोट्यातून ही जागा मिळवली होती. पण प्रवेश घेताना कुठलेही अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले नव्हते, अशी पुष्टी नवले प्रशासनातील सुत्रांनी दिली आहे. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : "माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी...", आमदार खोसकर संतापले

पूजा खेडकर यांनी 146/200 गुण मिळवून महाराष्ट्रातील विनाअनुदानित खाजगी महाविद्यालयांमधून प्रवेश मिळवला होता. पूजाला कॉमन सीईटीचा प्रयत्न करायचा होता, पण तिचा स्कोअर त्यापेक्षा जास्त होता. त्यांनी नवले मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये प्रवेश मिळवला होता.पूजा खेडकर यांच्या महाविद्यालयातील नोंदीनुसार तिला दहावीत 83% आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत 74% गुण मिळाले आहेत.. त्यानंतर 2011-2012 बॅचमध्ये त्या एमबीबीएस उत्तीर्ण झाल्या होत्या. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेसचे 'ते' आठ आमदार कोण?

प्रकरण काय? 

पुण्यात प्रशिक्षणार्थी असताना पूजा खेडकर यांनी अनेक सुविधांची मागणी केली होती. खरं तर या सुविधा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मिळत नाहीत. तरीही पूजा खेडकर यांनी  लाल-निळे दिवे आणि व्हीआयपी नंबर प्लेट असलेली तिची वैयक्तिक ऑडी कार वापरली होती, त्यांनी आपल्या वाहनावर 'महाराष्ट्र सरकार' असा फलक लावला आणि अधिकृत गाडी, निवास, कार्यालय कक्ष आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. इतकचं नाही तर त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरवरही ताबा मिळवला. होता. 

या सर्व प्रकरणानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकरची तक्रार केली. त्यानंतर पूजाची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT