2000 note, SBI : ना ओळखपत्र, ना फॉर्मची गरज; 2000 च्या नोटा कशा बदलायच्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

SBI : No hassle of filling form, no need to show identity card... Rs 2000 notes will be changed like this from tomorrow
SBI : No hassle of filling form, no need to show identity card... Rs 2000 notes will be changed like this from tomorrow
social share
google news

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयाच्या नोटा व्यवहारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. आता नोटा बदलण्याची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 23 मे 2023 पासून सुरू होत आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही या 2000 नोटा सहजपणे बदलू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म (रिक्विजिशन स्लिप) भरण्याची गरज नाही किंवा तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र मागितले जाणार नाही. तुम्ही एकावेळी 2000 रुपयाच्या 10 नोटा बदलू शकता. (how to change Rs 2000 notes in the bank)

ADVERTISEMENT

SBI कडून काय देण्यात आली माहिती?

2000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये ओळखपत्र दाखवावे लागले, असे दावे सोशल मीडियावर केले जात होते. या अहवालांवर, देशातील सर्वात मोठी बँक SBI ने त्यांच्या सर्व शाखांना कळवले आहे की, RBI ने गेल्या शुक्रवारी तात्काळ प्रभावाने चलनातून काढलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणताही फॉर्म आणि कोणतंही ओळखपत्र पुराव्याची आवश्यकता नाही. बँकेने 20 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात प्रत्येकाला 2,000 रुपयांच्या इतर मूल्यांच्या नोटा बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे.

30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार

चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या या 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. RBI नुसार, कोणतीही व्यक्ती एकावेळी 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकते. नोटा बदलण्याच्या प्रक्रियेबाबत आरबीआयच्या सूचनेनुसार सर्व बँकांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे बाजारातून 2000 च्या नोटा काढून घेण्याची घोषणा करताना RBI कडून असे सांगण्यात आले की, या नोटा सध्या कायदेशीर राहतील, तसेच मध्यवर्ती बँकेने सर्व बँकांना 2000 च्या नवीन नोटा जारी करू नयेत असे सांगितले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2016 मध्ये लाँच झाले… 2023 मध्ये बंद झाले

8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने देशात नोटाबंदीची घोषणा केली आणि तत्काळ प्रभावाने त्यावेळी बाजारात मोठा वाटा असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या होत्या. यानंतर आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. 2017 मध्ये या नोटाचं प्रमाण मोठं होतं. मार्च 2017 मध्ये दोन हजार रुपयांच्या सुमारे 89% नोटा मध्यवर्ती बँकेने जारी केल्या होत्या, परंतु 2018 मध्ये त्या कमी झाल्या आणि 31 मार्च 2018 रोजी 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा होता, एकूण नोटांमध्ये 37.3% शिल्लक होत्या, त्यामुळे त्यांची छपाई थांबवली होती. 31 मार्च 2023 रोजी बाजारात 2000 च्या नोटांचा वाटा फक्त 10.8% इतका कमी झाला.

कोणत्याही बँकेच्या शाखेत नोटा बदलता येतात

या नोटा चलनातून बाहेर काढण्याच्या घोषणेसोबतच, रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात सांगितले की, 2018-19 मध्येच बाजारातील वाटा सातत्याने कमी होत असल्याने 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. येथे एक प्रश्न असाही उपस्थित होत होता की ज्या बँकेत त्याचे खाते आहे त्याच बँकेतून कोणताही ग्राहक 2000 रुपयांची नोट बदलू शकतो का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 2000 notes ban : … तर ही वेळ आली नसती, राज ठाकरे मोदी सरकारवर संतापले

त्यामुळे रिझर्व्ह बँकेनेही यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून कोणतीही व्यक्ती देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन 2000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा एकावेळी बदलून घेऊ शकतात. म्हणजेच बँकेत खाते असणे आवश्यक नाही. नोटा बदलून देण्याची सुविधा मोफत असेल असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

ADVERTISEMENT

पी चिदंबरम म्हणाले ‘योग्य निर्णय’

19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँकेच्या 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही भूमिका मांडली. 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आपण आनंदी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चिदंबरम यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने केलेली चूक सुधारण्यासाठी सात वर्षे लागली.

हेही वाचा >> 2000 note banned : स्वातंत्र्याआधी झाली होती पहिली नोटबंदी; असा आहे इतिहास

चिदंबरम म्हणाले की, सरकार 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच त्यांनी 2016 मधील नोट बंदीवरही भाष्य केले आणि 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणे ही मोठी चूक होती आणि देशातील जनतेने ती स्वीकारली नाही, असे ते म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT