Sana Khan: नागपूरमधील भाजप महिला नेता बेपत्ता, हत्या झाल्याचा संशय
महाराष्ट्रातील भाजप (BJP) महिला नेता सना खान ही जबलपूरमधून बेपत्ता झाली आहे. तब्बल सात दिवस झाले तरी तिचा शोध लागलेला नाही. त्यामुळे तिची हत्या झाल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
Sana Khan Missing: नागपूर: महाराष्ट्रातील भाजप (BJP) महिला नेता बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान (Sana Khan) 1 ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. सना तिच्या बिझनेस पार्टनरला भेटण्यासाठी नागपूरहून मध्य प्रदेशातील जबलपूरला गेली होती, मात्र तेव्हापासून ती बेपत्ता झाली आहे. (sana khan nagpurs bjp woman leader missing from jabalpur fear of murder nagpur police reached jabalpur)
ADVERTISEMENT
सनाने घरच्यांना सांगितले होते की, ती दोन दिवसांत परत येईल. पण आठवडा झाला तरी सना परतली नाही किंवा तिच्याबाबत काहीही माहिती तिच्या कुटुंबीयांना अद्याप मिळालेली नाही. तसेच सनाचा फोन अद्याप बंद असल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता अधिक वाढली आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> PUBG गेम खेळताना मैत्री, तरुणीला हॉटेलवर बोलवून न्यूड Video केला शूट; अन्…
हे वाचलं का?
सना खान या नागपूर भाजपच्या सक्रिय महिला नेत्या आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती जबलपूरमध्ये तिचा बिझनेस पार्टनर पप्पू शाहू याला भेटायला गेली होती. पप्पू शाहू दारूच्या तस्करीत गुंतला होता आणि तो जबलपूरजवळ ढाबा चालवत असे. पैशाच्या व्यवहारावरून सना आणि पप्पूमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.
हे ही वाचा >> Kalyan Crime: 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण, आरोपी म्हणाला, ‘देवाने चार मुली दिल्या, पण…’
नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सना खानच्या शोधात पोलिसांचे एक पथक जबलपूरला गेले आहे. आतापर्यंत त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. तसेच पप्पू शाहू हा देखील कुटुंबासह फरार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे सना खानची हत्या झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सध्या नागपूर पोलीस जबलपूर पोलिसांच्या मदतीने सनाचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT