Sharad Pawar : “गौतम अदानींचं नाव घ्यावं लागेल, त्यांनी 25 कोटींचा चेक पाठवला”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Nationalist Congress Party President Sharad Pawar has once again praised industrialist Gautam Adani.
Nationalist Congress Party President Sharad Pawar has once again praised industrialist Gautam Adani.
social share
google news

-वसंत पवार, बारामती

ADVERTISEMENT

Sharad Pawar Gautam Adani : दिल्लीपासून मुंबईपर्यंत विरोधी पक्ष अदानी यांचं नाव घेत मोदी सरकारला घेरताना दिसत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी अनेकदा पंतप्रधान मोदींनी उद्योगपती अदानींचं नाव घेऊन लक्ष्य केलं. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना अदानींविरोधात रस्त्यावर उतरलेली. पण, या दोन्ही पक्षांच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भूमिकेवरून अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. काँग्रेस आणि ठाकरेंची सेना एकीकडे अदानींविरोधात टीका करत आहे, तर शरद पवारांनी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले. पवारांनी मानलेल्या आभाराची आता चर्चा होत आहे. (Sharad Pawar express gratitude about Gautam adani)

बारामतीत विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबोटिक लॅबच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमात शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानींचा उल्लेख करत त्यांचे आभार मानले. ते नेमकं काय म्हणाले, हे वाचा…

हे वाचलं का?

25 कोटींचा चेक… शरद पवारांनी अदानींबद्दल काय सांगितलं?

या कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, “ज्याचा मी मगाशीच उल्लेख केला की भारतातले पहिलेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उभारणी आपण करत आहोत, त्याचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाला पंचवीस कोटी रुपये लागणार आहेत. या पंचवीस कोटींची उभारणी करून आम्ही या कामात उडी टाकली आहे.”

हेही वाचा >> क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली! CM शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन, ‘वकिलांची फौज…’

“सुदैवाने आमच्या दोन सहकाऱ्यांना यासाठी मदत करण्याची विनंती मी केल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला होकार दिला. सिफोटेक ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील देशातील अत्यंत महत्वाची कंपनी आहे. त्यांनी दहा कोटी रुपयांची मदत यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो”, असं शरद पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘डबडं.. येडपट, रंग्या.. गप्प मरायचं ना’, भुजबळांना बोलताना जरांगेंनी सोडली पातळी

अदानींबद्दल बोलताना पवार यांनी सांगितलं की, “या प्रकल्पासाठी आणखी एका सहकार्‍याने मदत करण्याचा निर्णय घेतला व रक्कमही पाठवली, त्यामध्ये गौतम अदानी यांचे नाव या ठिकाणी घ्यावे लागेल. त्यांनी पंचवीस कोटी रुपयांचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे, या दोघांच्या मदतीने हे दोन्ही प्रकल्प आज आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत व प्रत्यक्ष त्याचे कामही सुरू झालेले आहे”, अशा शब्दात पवारांनी अदानींचे आभार मानले.

ADVERTISEMENT

अदानींवर टीका करण्यापासून लांब

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधी काँग्रेससोबत तर 2019 पासून महाविकास आघाडीचा भाग आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने अदानी-मोदी संबंधाचा मुद्दा उपस्थित करत असतात. राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करताना अदानींच्या उद्योग विस्तारावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी पवारांनी वेगळी भूमिका मांडली.

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंना अनपेक्षित धक्का.. ‘हा’ विश्वासू खासदार थेट भाजपमध्ये?

सध्या धारावी पुनर्विकास प्रोजेक्टची चर्चा सुरू आहे. हा प्रकल्प अदानी समूहाला मिळाला आहे. प्रोजेक्टमधील काही बाबींना विरोध करत काँग्रेसकडून टीका केली जात आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे दिसले, मात्र पवारांनी अद्याप भूमिका मांडलेली नाही. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील सख्य इतर विरोधी पक्षांना अडचणीत आणताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT