Maharashtra Weather: धो धो बरसणार! 'या' राज्यांना यलो अलर्ट, महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय?
उत्तर प्रदेशात सोमवारी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे (फाइल फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाने या राज्यांना दिला यलो अलर्ट

point

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार?

point

अंदमान, निकोबार आयलँडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

IMD Alert Rain Update, Maharashtra : उत्तर भारतासह देशातील अनेक भागात पाऊस स्थिर राहण्याची शक्यता आहे. पावसाळी हंगाम संपताच उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये थंडी वाढलीय. बदलत्या हवामानामुळे व्हायरल आजारांचे प्रमाणही वाढत असल्याचं समोर येत आहे. हवामान विभागाने दक्षिण राज्यांच्या अनेक भागात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात 35 ते 40 किमी प्रति तास वेगाने हवा सुरु राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी या परिसरापासून दूर राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय असणार आहे, जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

कोणत्या राज्यात पडणार मुसळधार पाऊस?

हवामान विभागानुसार, 20 ऑक्टोबरला अंदमान, निकोबार आयलँडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. याशिवाय तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, दक्षिण आणि उत्तर मध्य कर्नाटक, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. या राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात पावसाचा जोर असल्याने गारवा निर्माण झाला आहे.

हे ही वाचा >>  Horoscope In Marathi: 'या' राशीच्या लोकांसाठी गूड न्यूज! संपत्तीचे वादविवाद मिटतील, तर काहींचा बँक बॅलेन्स वाढेल

 

हे वाचलं का?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 21 ते 25 ऑक्टोबरपर्यंत काही राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अंदमान-निकोबार आयलँडसाठी यलो अलर्ट जारी राहणार आहे. तर कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, ओडिसा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार'', आदिती तटकरेंचं मोठं विधान

याशिवाय महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्री वाऱ्यांनी धुमाकूळ घातल्याने मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई आणि उपनगरात काल सायंकाळी हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारीही मुंबई जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT