Pune : राहुल हंडोरे दर्शना पवारचा नातेवाईक होता का? ओळख झाली तरी कशी?
दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात ज्याचा पोलीस पाच दिवसांपासून शोध घेत होते, त्या राहुल हंडोरेला अंधेरी रेल्वेस्थानकात मोठ्या शिताफीने पकडण्यात आले.
ADVERTISEMENT
Darshana Pawar Murder Case in Marathi : एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून तिसरी आलेली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झालेल्या दर्शना पवारच्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला. दर्शना पवारला मित्रानेच संपवलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला या प्रकरणी मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर अटक केली. या हत्याकांडानंतर राहुल हंडोरे कोण? तो दर्शनाचा नातेवाईक आहे का? दर्शना आणि राहुल यांची भेट नेमकी कधी आणि कशी झाली होती? हे आणि असेच असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. यातील काही प्रश्नांची उत्तरं समोर आली आहेत.
ADVERTISEMENT
दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात ज्याचा पोलीस पाच दिवसांपासून शोध घेत होते, त्या राहुल हंडोरेला अंधेरी रेल्वेस्थानकात मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. दर्शना पवार हत्येप्रकरणी 19 जून रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते. या काळात राहुल हंडोरे पश्चिम बंगालमध्येही गेला होता. अंधेरीवरून पुन्हा तो पुढे जाणार होता. पण, त्याआधीच त्याच्या हातात बेड्या पडल्या.
राहुल हंडोरे आणि दर्शना पवार नातेवाईक होते का?
या हत्या प्रकरणानंतर राहुल हंडोरे हा दर्शना पवारचा दूरचा नातेवाईक असल्याचंही म्हटलं गेलं. पण, याबद्दल पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनीच अधिकृत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राहुल हंडोरे आणि दर्शना पवार हे एकमेकांचे नातेवाईक नव्हते.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Patna : 17 पक्ष, अजेंडा आणि… विरोधकांसमोर आहेत ‘ही’ मोठी आव्हानं
अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दर्शना पवारचे मामा जिथे राहतात, त्यांच्या घरासमोरच राहुल हंडोरेचं घर आहे. त्यामुळेच दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत होते. तिथूनच त्यांची ओळख पुण्यात वाढत गेली.
मिळालेल्या माहितीनुसार राहुल हंडोरे हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आला. दर्शनाही कोपरगावातून पुण्यात आली. तिथेच त्यांचे संबंध अधिक घट्ट झाले.
ADVERTISEMENT
काम करून स्पर्धा परीक्षेची तयारी
राहुल हंडोरे हा पुण्यात अर्धवेळ काम करून स्पर्धा परीक्षेची तायरी करत होता. फूड डिलिव्हरी बॉय म्हणून तो काम करायचा आणि उर्वरित वेळेत अभ्यास करायचा. त्यातच एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि दर्शना पवार उत्तीर्ण झाली. राहुल हंडोरे मात्र नापास झाला. त्यातच राहुलने दर्शनाला लग्नाबद्दल बोलला आणि तिने नकार दिला. त्यातूनच त्याने हे कृत्य केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> क्लासमेट, अफेअर आणि MPSC पास झाल्यावर दूर गेली… म्हणून राहुलने केली दर्शनाची हत्या!
कोण आहे राहुल हंडोरे?
पुणे पोलिसांच्या कोठडीत असलेला राहुल हंडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या शाह गावाचा रहिवाशी आहे. त्याने बीएससीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यानंतर तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आला होता. 12 जून रोजी राहुल हंडोरे दर्शनाला राजगड बघण्यासाठी घेऊन गेला. तिला राजगडावर न नेता सीतेचा माळ घेऊन गेला आणि तिची हत्या केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT