अरेरे.. गटाराच्या पाण्यात धुतली मेथी, VIDEO पाहून तुम्हालाही येईल किळस

मिथिलेश गुप्ता

Ulhasnagar Viral Video: उल्हासनगरमध्ये गटाराच्या पाण्यता धुतलेली मेथीची भाजी विकली जात असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे.

ADVERTISEMENT

गटाराच्या पाण्यात धुतली मेथी
गटाराच्या पाण्यात धुतली मेथी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तुम्ही हिरव्या भाज्या खात असाल तर... सावध व्हा

point

उल्हासनगरमध्ये गटाराच्या पाण्यात धुतल्या जातात भाज्या, आरोग्य विभागाकडून कारवाईची मागणी

point

खेमाणी मार्केट परिसरातील किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ समोर

Fenugreek washed in sewer water: उल्हासनगर: उल्हासनगरमधील खेमाणी मार्केट परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काही भाजी विक्रेते गटाराच्या घाण पाण्यात पालेभाज्या धूत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे भाजी विक्रेत्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या भाजीवाल्यांवर कारवाई करण्याची  मागणी आता केली जात आहे. (you will also be disgusted after seeing the viral video of fenugreek washed in sewer water from ulhasnagar)

नेमकी घटना काय?

उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील खेमाणी परिसरात असलेल्या भाजी मार्केटच्या पोस्ट ऑफिस समोर उघडं गटार आहे. भाजी विक्रेते या गटाराच्या घाण पाण्यात पालेभाज्या बुडवून धुतात. याव्यतिरिक्त, गटाराचं पाणी बादलीने भाज्यांवर मारून त्यांची विक्री केली जाते.

हे ही वाचा>> Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवलीतही पुण्यासारखीच कारवाई होणार, हजारो लोक होणार बेघर, प्रकरण काय?

हे पाणी गटारातून आलेले असल्याने या भाज्यांमध्ये जंतू आणि अशुद्धता असण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

पाहा VIDEO

डॉक्टर लोकांना तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा वापर करण्याचा सल्ला देतात. परंतु गटाराच्या पाण्यात बुडवलेल्या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकतात. या घटनेच्या विरोधात उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्वरित कारवाईची मागणी केली जात आहे.

हे ही वाचा>> Amravati : 22 दिवसांच्या बाळाला लोखंडी सळईने 65 चटके, श्वास घेता येत नव्हता म्हणून अंद्धश्रद्धेतून विचित्र प्रकार

उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणी भाजी विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि अशी घटना पुन्हा होऊ न देण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे आणि प्रशासनाकडून त्यावर त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp