Teachers day viral video : विद्यार्थ्याने असं काय केलं शिक्षकाने धो धो धुतलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

This video going viral has been shared with the Twitter handle named Bihar_se_hai. in this video teacher beat to student
This video going viral has been shared with the Twitter handle named Bihar_se_hai. in this video teacher beat to student
social share
google news

Teachers day celebration viral video : मंगळवारी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला. शिक्षक दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम साजरे झाले. अभिनंदनाचे मेसेज आणि सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, यात एक व्हिडीओ खूप गाजतोय. एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

ADVERTISEMENT

या व्हिडिओमध्ये शाळेच्या वर्गातील काही मुले त्यांच्या शिक्षकासोबत शिक्षक दिन साजरा करत आहेत. वर्गात भरपूर फुगे, सजावट आणि मुलांची गर्दी आहे. काही भेटवस्तू टेबलावर ठेवल्या आहेत. शिक्षक सर्वांच्या मध्यभागी बसले आहेत आणि टाळ्या वाजवल्या जात आहेत. त्याचवेळी असे काही घडते की गुरुजींना राग येतो.

विद्यार्थ्याला धरलं आणि धू धू धुतलं

खरं तर कार्यक्रम सुरू असतानाच एक विद्यार्थी शिक्षकावर बर्फाचा स्प्रे उडवतो. त्यामुळे शिक्षकांना खूप राग येतो. विद्यार्थ्याचा शर्ट पकडतात आणि ओढतात. त्याचे केस पकडून त्याच्या पाठीत धबाधब मारतात. यानंतर कार्यक्रमातील वातावरण बदलून सगळेच शांत होतात.

हे वाचलं का?

हा व्हायरल व्हिडिओ बिहार_से_है नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या ट्विटला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर खूप कमेंट करायला सुरुवात केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

‘करा आणखी शिक्षक दिन साजरा’

एका यूजरने लिहिले आहे- शिक्षक हा शिक्षक असतो, त्याची चेष्टा करू नका. दुसऱ्याने मिश्किलपणे लिहिले आहे की, करा आणखी शिक्षक दिन साजरा. एका यूजरने लिहिले – खोडकर मुले कुठेही गेले तरी सुधरत नाही. आणखी एकाने लिहिले – शिक्षकाने तर कमालच केली, सगळं वातावरणच बदलून टाकलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT