‘RBI सह मुंबईतील 11 ठिकाणं बॉम्बने उडवून देऊ’, धमकीच्या ई-मेलमुळे पोलीस अलर्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Threats to blow up 11 places including Reserve Bank of India office in Mumbai
Threats to blow up 11 places including Reserve Bank of India office in Mumbai
social share
google news

Bomb Threat: मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) कार्यालयाला बॉम्बने (Bomb) उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरबीआयचे कार्यालय (RBI Office) उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल (e-mail) पाठवण्यात आल्याने आता सगळ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणी आता तपास सुरु करण्यात आला असून पाठवण्यात आलेला धमकीचा ई-मेल हा खिलाफत इंडियाशी संबंधित असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

राजकारण तापणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकीच्या मेलबरोबर मुंबईतही 11 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचेही सांगितले आहे. या प्रकरणामुळे आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणामुळे राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा >> ‘अजित पवार चार महिन्यात तुरुंगात जाणार’, शालिनीताईंनी थेट दावाच केला

राजीनाम्याचीही मागणी ईमेलद्वारेच

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जो ईमेल पाठवण्यात आला आहे, त्यामध्ये आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे. ज्या प्रकारे ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे, त्याच प्रकारे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याचीही मागणी ईमेलद्वारेच केली गेली आहे.

हे वाचलं का?

धमकीमुळे मोठी घबराट

आरबीआयच्या धमकीच्या मेलमध्ये मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचे सांगून याकडे दुर्लक्ष करू नका अशीही धमकी देण्यात आली आहे. मंगळवार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा स्फोट होणार असल्याचे त्या ई-मेलमध्ये नमूद केले गेले आहे.बँकेला मिळालेल्या धमकीमुळे मोठी घबराट पसरली होती, हा ई-मेल मिळाल्यानंतर पोलिसांनी सतर्क होत तपासकार्याला सुरुवात केली, कसून तपास करूनही कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही असंही स्पष्ट करण्यात आले.

धमकीकडे दुर्लक्ष नको

या धमकी प्रकरणी आता मुंबईतील एमआरए मार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आता आयटी तज्ज्ञांनी मदत घेऊन तपास सुरु केला आहे. या धमकीच्या मेलमध्ये आमच्या धमकीकडे दुर्लक्ष करू नका अशीही धमकी देण्यात आली आही.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Dino Morea : नितेश राणे ज्याला म्हणाले होते ‘बीएमसीचा सचिन वाझे’, ‘तो’ अभिनेता मोदींच्या पार्टीत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT