BJP: उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी सुनावलं, म्हणाले; जरा तुमची भाषा…

योगेश पांडे

ADVERTISEMENT

After Uddhav Thackeray criticized Devendra Fadnavis in a meeting in Nagpur, BJP Union Minister Nitin Gadkari has advised Thackeray to use his language carefully.
After Uddhav Thackeray criticized Devendra Fadnavis in a meeting in Nagpur, BJP Union Minister Nitin Gadkari has advised Thackeray to use his language carefully.
social share
google news

नागपूर: शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर तुफान टीका केली. अत्यंत बोचऱ्या शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. असं असताना आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्या पक्षातील नेत्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना कठोर शब्दांत सुनावलं आहे. (uddhav thackeray criticized devendra fadnavis nagpur bjp union minister nitin gadkari advised thackeray use language carefully bjp shiv sena ubt)

‘उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.’ असा सल्ला देत नितीन गडकरी यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

नितीन गडकरींना ठाकरेंना सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाले.

‘श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.’ असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘देवेंद्र फडणवीस नागपूरला कलंक’, उद्धव ठाकरेंनी नेमकी काय टीका केली?

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरच्या बालेकिल्ल्यातूनच जोरदार हल्ला चढवला.

ADVERTISEMENT

‘देवेंद्र फडणवीस आपले माननीय उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची अवस्था आता विचित्रच झाली आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. काय झालंय काय नाही, काहीतरी झालंय नक्की पण सांगण्यासारखं नाही.’ अशी खिल्ली ठाकरेंनी उडवत फडणवीसांची एक ऑडीओ क्लिपच सभेत ऐकवली.

ADVERTISEMENT

या क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात ‘एकवेळ अविवाहित राहणे पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही.’ ही क्लिप लावल्यानंतर ठाकरेंनी फडणवीसांच्या त्या भूमिकेची देखील आठवण करून दिली.

हे ही वाचा>> ‘देवेंद्र फडणवीस नागपूरला कलंक’, उद्धव ठाकरेंनी ऑडिओ क्लिपच लावली!

‘तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता. त्या सगळ्या भ्रष्टाचारांना बदनाम करायचं, आरोप करायचा, त्यांच्यामागे यंत्रणा लावायचा आणि दहशतीच्या वातावरण निर्माण करायचं आणि नंतर त्यांनाच भाजपात घेऊन मंत्री करायचं.’ अशी टीका देखील ठाकरे यांनी भाजपवर केली.

‘देवेंद्र फडणवीस हे नागपूरला कलंक आहे. 2014 ते 19 मध्ये मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून निरोप होते. परंतु मी केलं नाही.. परंतु आत्ताच करण्याची वेळ आली. 2014 मध्ये मी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन घरी आलो होतो. कारण निवडणूक दोन दिवसावर आली होती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती उमेदवार नक्की करत होतो. तेवढ्यात एकनाथ खडसे यांचा फोन आला होता आणि त्यांनी म्हटलं की आता उद्धव ठाकरे तुमच्यासोबत आमची युती शक्य नाही.’

हे ही वाचा>> ‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्यासोबतच..’, फडणवीसांचा तात्काळ ठाकरेंवर पलटवार

‘हिंदुत्वाच्या पायावर कुऱ्हाड 2014 साली भारतीय जनता पक्षाने मारली आहे. मी टोमणे मारत नाही.तळमळीने बोलतो.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘कलंकीचा काविळ’ देवेंद्र फडणवीसांकडून तात्काळ प्रत्युत्तर

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी जहरी टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन तात्काळ ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले.

‘कलंकीचा काविळ’ !

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT