…म्हणून अमित शाहांनी संभाजीनगर दौरा रद्द केला, अजित पवारांनी केला खुलासा
Union Minister Amit Shah Latest News Marathi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची माहिती दिली.
ADVERTISEMENT

Ajit Pawar On Amit Shah Chhatrapati Sambhaji Nagar Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरला येणार होते. पण, त्यांचा दौरा रद्द झाला आहे. शाह यांचा दौरा रद्द होण्याच्या कारणाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुलासा केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी पुण्यात संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली.
हेही वाचा >> NCP: सर्वात मोठी बातमी… राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
अजित पवार म्हणाले, “तीन राज्यातील निवडणुका येऊ घातल्या आहेत. जी20 च्या निमित्ताने अनेक मान्यवर दिल्लीत आले होते. आता पाच दिवसांचं लोकसभेचं अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या सगळ्या गोष्टी घडत आहेत.”
“आम्ही आधीच अमित शाह यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामाला बोलावलेलं होतं. पण, त्यांच्या कामाच्या व्यापामुळे तो कार्यक्रम थांबवावा लागला. त्यांना इतर कामांना अग्रक्रम द्यावा लागत असल्यामुळे त्यांना येता येणार नाही म्हणून तो कार्यक्रम रद्द करण्यात आला”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
हेही वाचा >> मुंबई विमानतळावर 8 प्रवाशांसह चार्टर विमान कोसळलं, नेमकं काय घडलं?
“मी संभाजीनगरला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी लागणारा अधिकारी वर्ग संभाजीनगरला असणार आहे. तिथे मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय होतील. पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे”, असे अजित पवारांनी सांगितले.
17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते. त्यांची सभाही होणार होती, पण त्यांचा दौरा रद्द झाला आहे.