‘Love मॅरेज करणाऱ्यांना कुणबी आरक्षण कसं?’, मनोज जरांगेंचं उत्तर ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल!
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापलेला असतानाच मनोज जरांगे पाटील यांना लव्ह मॅरेज आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ नेमका कसा मिळणार असा सवाल केल्यावर मात्र त्यांनी कायद्याच्या भाषेत आणि आपल्या शैलीत भन्नाट असं उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil: राज्यात मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी रान उठवले आहे. मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) अनेक मुद्देही उपस्थित केले जात आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर ओबीसी समाजाच्या (OBC) आरक्षणाचं काय होणार? ते कसं मिळणार आणि ज्यांच्याकडे नोंदी नसतील त्यांना आरक्षणाचा लाभ कसा घेता येणार असे एक ना अनेक सवाल उपस्थित गेले आहेत. यावेळी त्यांना लव्ह मॅरज (Love Marriage) करणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ कसा मिळणार असा सवाल केल्यावर त्यांनीही भन्नाट उत्तर देत त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
आंतरजातीय विवाह आणि आरक्षण
या सवाल बरोबरच जरांगे पाटील यांना आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आणि लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेम विवाह करणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार का आणि मिळाला तर तो कसा घेता येणार असा सवाल उपस्थित केला गेला. पत्रकारांच्या त्या सवालावर मात्र जरांगे पाटलांनी दिलेल्या उत्तरावर जोरदार हशा पिकला आहे.
हे ही वाचा >> Budget 2024 : बजेटमधून वैद्यकीय क्षेत्राला नेमकं काय मिळालं?
लव्ह मॅरेज करणारे…
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावरून निर्माण झालेल्या वादावर बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले की, लव्ह मॅरेज करणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ कसा मिळणार असा सवाल करण्यात आला. त्यावर जरांगे पाटील यांनी त्यांच्या शैलीत त्यांनी उत्तर देत, ‘त्यांना जाऊ दे ना नदीच्या कडेकडेनं, हिंडून येऊ द्या म्हणत त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.’
हे वाचलं का?
सगेसोयरे म्हणजे नेमकं कोण?
सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे नेमकं कोणाला मिळणार आणि ते कसं मिळणार यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रक्ताचे नातेसंबंध आणि सगेसोयरे म्हणजे ज्या ठिकाणी पिढ्यान् पिढ्या सोयरिक जमवली जाते, लग्न जमवलं जातं तो सगेसोयरा असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे याच नोंदीवर मराठा समाजातील ज्यांच्याकडे नोंदी नसतील त्यांना आरक्षण द्यायचं असंही त्यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
गणगोतानुसार सोयरिक
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी आंतरजातीय विवाहमध्ये आरक्षण मिळणार आहे का असाही सवाल त्यांना करण्यात आला. यावेळी त्यांना अजिबात आरक्षण मिळणार नाही कारण परंपरेनुसार आणि ज्या ठिकाणी गणगोताच्या सोयरिक जुळतात त्यांनाच आरक्षण मिळणार असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Budget 2024 : पहिलं बजेट मांडणारा होता ब्रिटीश नागरीक…, काय आहे भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT