Mumbai Crime News : एअर होस्टेस तरुणीची हत्या, पवईतील फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
mumbai crime news in marathi : मुंबईतील पवई भागात एका फ्लॅटमध्ये 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. तरुणी एअर होस्टेस असून, या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
Air hostess body found in mumbai : मुंबईतील पवई भागात एक धक्कादायक घटना समोर आलीये. एअर होस्टेस असलेल्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, हत्या कुणी केली याचा तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
रविवारी (3 सप्टेंबर) रात्री मुंबईतील पवई पोलीस ठाणे हद्दीतील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समोर येताच सोसायटीमध्ये सगळ्यांनाच धक्का बसला.
Mumbai Crime : नेमकी कुठे घडली घटना?
सोसायटीतील नागरिकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील मारवाह रोडवरील एनजी हाऊसिंग सोसायटीत 22-25 वर्षे वय असलेल्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
हेही वाचा >> मुंबईत दोन सावत्र मुलांसह नवऱ्याचा बायकोवर सामूहिक बलात्कार,नंतर व्हिडिओ बनवून…
फ्लटॅमध्ये पडलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी 4 पथके तयार केली आहेत.
Video >> अजित पवारांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसमोर कोणाला दिला दम?
तरुणी एअर होस्टेस आहे आणि ती सध्या प्रशिक्षण घेत होती, इतकीच माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली. ही तरुणी फ्लॅटमध्ये कधीपासून राहतेय, तिची हत्या का करण्यात आली आणि कुणी केली? या अंगाने पोलीस सध्या तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
तरुणीचा मृतदेह सापडल्याने रहिवाशी हादरले
दरम्यान, सोसायटीतील फ्लॅटमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने इतर रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. मयत तरुणीबद्दल अधिक माहिती मिळवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT