Tamil Nadu: किरकोळ कारणावरून 9वर्षीय इन्स्टा क्वीनची गळफास लावून आत्महत्या
तामिळनाडूतील पेरियाकुप्पम येथून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथे एका 9 वर्षीय मुलीने किरकोळ कारणावरून आत्महत्या केली असल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
A 9-year-old insta queen committed suicide : तामिळनाडूतील पेरियाकुप्पम येथून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथे एका 9 वर्षीय मुलीने किरकोळ कारणावरून आत्महत्या केली. प्रतीक्षा नावाच्या मुलीने तिच्या पालकांनी तिला अभ्यास करण्यास सांगितल्यामुळे असे टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. या नऊ वर्षांच्या मुलीला तिचे शेजारी ‘इन्स्टा क्वीन’ म्हणत. प्रतीक्षाचे वडील कृष्णमूर्ती यांनी मुलीला घराजवळ खेळताना पाहून घरी जाऊन अभ्यास करण्यास सांगून घराच्या चाव्या दिल्या. (A 9-year-old insta queen committed suicide by hanging herself for a minor reason)
ADVERTISEMENT
अधिक वाचा- Ruchismita Guru : आकांक्षानंतर आणखीण एका अभिनेत्रीची आत्महत्या,गूढ अवस्थेत सापडला मृतदेह
यानंतर ते दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी बाहेर गेले असता रात्री 8.15 वाजेच्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना घर आतून बंद असल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितले. प्रतीक्षाने प्रतिसाद न दिल्याने कृष्णमूर्ती घाबरले आणि मागची खिडकी तोडून आत गेले आणि त्यांची मुलगी गळ्यात टॉवेल लटकलेली दिसली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा- Chandrashekhar Patil: शिवराज पाटील चाकूरकरांच्या चुलत भावाची गोळ्या झाडून आत्महत्या
विशेष म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने एका 10 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. आईच्या खरडपट्टीनंतर त्याने हे धाडसाचे पाऊल उचलले. लखनौच्या हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या चितवापूर भागातील हे प्रकरण आहे. खरं तर, पतीच्या निधनानंतर, कोमल (40) तिचा मुलगा आरुष (10 वर्षे) आणि मुलगी विदिशा (12 वर्षे) सोबत तिच्या वडिलांच्या घरी राहत होती.
ADVERTISEMENT
अधिक वाचा- Akanksha Dubey आत्महत्या प्रकरणात नवा ट्वि्स्ट, दिग्गज अभिनेत्यावर हत्येचा आरोप
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आरुष अनेक दिवसांपासून शाळेत जात नव्हता. त्याच वेळी तो दिवसभर घरात मोबाईल गेम खेळत असे. हे त्याला अनेकदा समजावूनही सांगण्यात आले. दरम्यान, घटनेच्या दिवशी आईने मुलाला बेदम मारहाण करून त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि निघून गेली. यामुळे संतापलेल्या मुलाने गळफास लावून घेतला.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT