गोव्यात डच तरुणीसोबत घडला भयंकर प्रसंग; रिसॉर्टमधील कर्मचारीच निघाला वासनांध
गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या एका नेदरलॅंड (Dutch) तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
Goa Crime :
ADVERTISEMENT
पणजी : गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या एका नेदरलॅंड (Dutch) तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर गोव्यातील (Goa) मांद्रे येथील विग्वाम रिसॉर्टमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणात गोवा पोलिसांनी अभिषेक वर्मा (27) नावाच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती, उत्तर गोव्याचे पोलीस अधिक्षक निधिन वालसन यांनी दिली. (A Dutch girl who came to Goa for tourism was attempted to be raped)
या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेदरलँडची रहिवासी असलेल्या 29 वर्षीय एक युवती भारतात पर्यटनासाठी आली होती. काही दिवस मुंबईत फिरल्यानंतर ती सोमवारी गोव्यात दाखल झाली. 4 दिवस गोव्यात राहणार होती. दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर संबंधित युवतीने उत्तर गोव्यातील मांद्रे गाठले. तिथे तिला विग्वाम हॉटेलच्या रुम्स आवडल्या आणि पुढील 4 दिवसांसाठी याच ठिकाणी रुम बुक केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा : मच्छर मारणाऱ्या कॉईलने घेतला एकाच कुटुंबातील 6 जणांचा जीव, नेमकं काय घडलं?
या दरम्यान, मंगळवारी रात्री ती रुममध्ये झोपली असताना हॉटेलमधील बार टेंडर कर्मचारी अभिषेक वर्मा याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती मदतीसाठी ओरडून याचना करत होती. त्याचवेळी हॉटेलच्या बाजूला असलेल्या युरिको डायस नावाच्या व्यक्तीने मदतीसाठी धाव घेतली. पण यावेळी कर्मचाऱ्याने दोघांवरही चाकू हल्ला केला आणि तिथून पळ काढला. पण अखेर पोलिसांनी अभिषेक वर्माला अटक केली आहे.दरम्यान, या घटनेची नोंद नेदरलँडच्या दूतावासाने याची दखल घेतली असून, नेदरलॅंडचे अधिकारी गोव्यात दाखल झाले आहेत.
हेही वाचा : घरात नवरा-बायकोसारखे राहायचे चुलत भाऊ-बहीण, सत्य समोर येताच घडलं फारच…
सत्ताधारी-विरोधक काय म्हणाले?
या घटनेनंतर गोव्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे. परदेशी व्यक्तीसोबत घडलेली घटना दुर्दैवी असून अशा घटना रोखण्यासाठी गोवा सरकार आणि पर्यटन विभाग कठोर पावले उचलणार आहे. छोट्या राज्यात अशा घटना घडल्या की त्या मोठ्या होतात. पण भविष्यात परदेशी नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी हामी पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी दिली. तर या घटनेनंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याचे नाव बदनाम झाले आहे, G20 परिषदेत हा मुद्दा उपस्थित केल्यास गोव्याला मोठा फटका बसेल, अशी भीती गोवा फॉरवर्डचे नेते आणि आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT