Sextortion : तरुणीने टाकलं प्रेमाचं जाळं अन् रेल्वे कर्मचाऱ्याचा गेला जीव; करु नका ‘ही’ चूक

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Chat, video call and cheating... a man trapped in the trap of sextortion, gave up her life... Don't make this mistake
Chat, video call and cheating... a man trapped in the trap of sextortion, gave up her life... Don't make this mistake
social share
google news

Sextortion Case in India : तरुणीने फेसबुकवरून टाकलेल्या जाळ्यात रेल्वे कर्मचारी अडकला. प्रकरण इतकं पुढे गेलं की, त्याला आत्महत्या करावी लागली. लैंगिक शोषणाचे नवे प्रकरण समोर आले आहे. फेसबुकवरून सुरू झालेल्या या कहाणीचा शेवट आत्महत्येनं झाला आहे. हे प्रकरण काय… आणि ते टाळण्यासाठी काय करायला हवं, जाणून घेऊयात…

ADVERTISEMENT

या प्रकरणाची सुरुवात फेसबुकवरून झाली. मयत रेल्वे कर्मचाऱ्याला एका तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. फेसबुकवर तरुणीचे नाव कोमल शर्मा होते. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर तिने चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल सुरू केले. शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) दिलेल्या तक्रारीवरून ही माहिती मिळाली आहे.

हेही वाचा >> इंटरव्ह्यूला निघालेल्या तरुणीवर कॅबमध्येच सपासप वार; कारण आलं समोर

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉलिंगदरम्यान काही अश्लील कृती झाली, जी तरुणीने रेकॉर्ड केली. यानंतर तरुणीने रेल्वे कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि अखेर रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्या केली.

हे वाचलं का?

पैशांची मागणी अन् आत्महत्येने शेवट

आरोपी तरुणीने सुरुवातीला 2 लाख रुपयांची मागणी केली. मयत व्यक्तीने कशीतरी व्यवस्था करून तरुणीला पाठवले. यानंतरही ब्लॅकमेलिंग सुरूच राहिली. तरुणीकडून रेल्वे कर्मचाऱ्यांचा छळ सुरूच होता. पुढे कोमल व्यतिरिक्त आणखी दोन जणांनी तिचे नाव घेऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

कोमल शर्मा तिच्या काही साथीदारांसह रेल्वे कर्मचाऱ्याला धमकावू लागली. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देऊ लागली. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्याला इतकं दडपण आणि नैराश्य आले की त्याने आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’, सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

या प्रकरणी जीआर पोलीसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. तिघांचीही चौकशी सुरू असून, अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Sextortion होऊ नये म्हणून काय करायचं? (How do you handle sextortion?)

सेक्सटोर्शनपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवणे महत्वाचे आहे. लैंगिक शोषण टाळण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.

फक्त सुरक्षित वेबसाइटला भेट द्या : ज्या वेबसाइट्सच्या URL च्या आधी लॉक आहे त्यांना भेट द्या. लाल लॉक मार्क असलेल्या वेबसाइट्स उघडल्या पाहिजेत.

फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना : फेसबुक किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी एकदा ती तपासून पहा.

वैयक्तिक फोटो पोस्ट करू नका : सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करताना लक्षात ठेवा की वैयक्तिक किंवा खासगी आयुष्य सार्वजनिक होणार नाही.

चुकीची माहिती कळवा : सोशल मीडिया अकाऊंटमध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिसली, तर ती त्वरित कळवावी. जर यूजरची इच्छा असेल तर ते त्यांचे प्रोफाइल लॉक देखील करू शकतात.

अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल : अनोळखी नंबरवरून येणारे व्हिडिओ कॉल उचलणे टाळावे. तसेच, अज्ञात लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT