Pune Crime : पत्नी-पुतण्याला का घातल्या गोळ्या? कारण येणार समोर, पोलिसांना तपासाचा मार्ग सापडला
पुण्यात सहायक पोलिस आयुक्त भारत गायकवाड (Bharat Gaikwad) यांनी पत्नी- पुतण्याची गोळ्या झाडून हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 24 जुलै रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे (Pune) शहर हादरलं होतं.
ADVERTISEMENT
Crime News in Marathi : पुण्यात सहायक पोलिस आयुक्त भारत गायकवाड (Bharat Gaikwad) यांनी पत्नी- पुतण्याची गोळ्या झाडून हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 24 जुलै रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे (Pune) शहर हादरलं होतं. या घटनेनंतर आता भारत गायकवाड सारख्या इतक्या मोठ्या पोलिस अधिकाऱ्याने पत्नी- पुतण्याची हत्या करून स्वत: आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी कसून तपास सूरू करून या हत्येमागचं कारण शोधायला सुरुवात केली आहे.त्यानुसार आता पोलीस मृत व्यक्तींच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅप चॅटसह इतर अनेक गोष्टींचा तपास करणार आहेत. या तपासातून आता हत्येमागचं कारण समोर येते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (acp bharat gaikwad suicide wife and nephew killing police use technical leads and past communication for investigation)
ADVERTISEMENT
पुतण्या घरी परतणार होता, पण…
सहायक पोलिस आयुक्त भारत गायकवाड (Bharat Gaikwad) हे गेल्या दोन वर्षापासून अमरावतीत कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबिय हे पुण्यात राहत होते. गेल्या 15 जुलैला सुट्टी घेऊन भारत गायकवाड पु्ण्यात आपल्या कुटुंबियांकडे आले होते. हत्येच्या दिवशी भारत गायकवाड यांचा पुतण्या दीपक गायकवाड (nephew) घरी मटण घेऊन आला होता. गायकवाड ज्या ज्या वेळी घऱी यायचे, त्या त्या वेळेस पुतण्या मटण घेऊन यायचा. त्या दिवशी संपूर्ण कुटुंबियांनी मटणावर ताव मारला होता. मटण खाल्यानंतर पुतण्या दीपक हा घरी जाणार होता. मात्र बाहेर जास्तच पाऊस असल्याने तो गायकवाड यांच्या घरीच थांबला होता.
हे ही वाचा : Pune Crime News : महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार! सावकाराचं भयंकर कृत्य
बेडरूममध्ये काय घडलं?
मटणावर ताव मारल्यानंतर रात्री संपूर्ण कुटुंब झोपी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री अचानक गायकवाड यांच्या बेडरूममधून भांडणाचा आवाज आला. या आवाजानंतर गोळीबार देखील झाला. हा आवाज एकताच भारत गायकवाड यांच्या मुलासह आजी आणि पुतण्या बेडरूमच्या दिशेने गेले. त्यांनी दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला मात्र गायकवाड यांनी उघडलाच नाही. यावेळी डुप्लिकेट चावीने पुतण्याने बेडरूमचा दरवाजा उघडून आत शिरण्याचा प्रयत्न केला असता भारत गायकवाड यांनी बंदुकीतून गोळी झाडली. ही गोळी जाऊन पुतण्या दीपकला लागली. तत्पुर्वी पत्नी मोनी गायकवाड यांचा बेडरूममध्ये गोळी लागल्याने मृत्यू झाला होता.
हे वाचलं का?
दरम्यान दीपकला गोळी लागल्यानंतर गायकवाड यांच्या मुलाने व आईने त्यांच्या हातातून बंदुक हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र गायकवाड य़ांनी दोघांनाही ढकलून त्यांना गोळी झाडून मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुलगा आणि आजी घराबाहेर जाताच भारत गायकवाड यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली होती. गायकवाड यांनी स्वत:च्या लायसेन्स बंदूकीने हा संपूर्ण घटनाक्रम केला होता.
हे ही वाचा : फेसबुकवर मैत्री केली, हॉटेलवर बोलावलं अन् गॅंगरेप करून…महिलेसोबत घडली भयंकर घटना
या प्रकरणात मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारत गायकवाड यांच्या विरोधात शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित तरतुदींसह आयपीसीच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. आता भारत गायकवाड यांनी पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यांची हत्या करून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या का केली? यामागचं कारण पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी या प्रकरणात आता भारत गायकवाड, पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यांची कॉल हिस्टरी, व्हॉट्सअॅप चॅट तपासायला सुरुवात केली आहे. तसेच घटनेपुर्वी मृत व्यक्तींनी कुणा-कुणाची भेट घेतली होती, या भेटीत त्यांचे काय बोलणे झाले होते. या सर्व दिशेने तपास करायला सुरूवात केली आहे. आता या तपासातून पोलिसांच्या हाती काय सुगावा लागतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT