‘भर चौकात गोळ्या घालेन’, हॉट अभिनेत्री उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी
अभिनेत्री उर्फी जावेद आता तिच्या ना ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. ना तिच्या स्टाईलमुळे, ती आता चर्चेत आली आहे ते तिला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्या व्हिडीओमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत तिला एका व्यक्तीने ई-मेल करुन धमकी दिली आहे.
ADVERTISEMENT
Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेदने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवरुन (Instagram) एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओमध्ये (Viral Video) तिने भूलभूलैय्या चित्रपटातील राजपाल यादवसारखा (Rajpal Yadav) पंडितचा गेटअप (Pandit Gate up) करुन व्हिडीओ केला होता. मात्र तर उर्फी जावेद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. आपल्या कपड्यांची डिझाइन आणि नव नव्या करत असलेल्या फॅशनमुळे उर्फी जावेदला आता जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
ADVERTISEMENT
ई-मेलवरुन थेट धमकी
काही दिवसांपूर्वी राजपाल यादवच्या गेटअपमध्ये तिने व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. पंडितच्या गेटअपमध्ये असलेल्या उर्फीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तिला ट्रोलही करण्यात आले होते. मात्र आता एका अज्ञात व्यक्तीकडून उर्फीला ईमेल करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
व्हिडीओ डिलीट कर नाही तर..
त्या ई-मेलवरून आलेल्या धमकीमध्ये त्या व्यक्तीने तिला तो व्हिडीओ डिलीट करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. तो व्हिडीओ डिलीट नाही केला तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ठार मारायला वेळ लागणार नाही
शेअर केलेल्या त्या व्हिडीओमुळे उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर तिने या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे. उर्फीला दोन वेगवेगळ्या आयडीवरुन धमकीचा ई-मेल करण्यात आला आहे. ज्यावेळी तिला पहिला ई-मेल आला तो निखिल गोस्वामीच्या नावाने होता. त्यामध्ये लिहिले होते की, उर्फी जो तू व्हिडीओ अपलोड केला आहे, तो व्हिडीओ लगेच डिलीट कर. नाही तर तुला ठार मारायला वेळ लागणार नाही अशा शब्दात तिला धमकी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
तू तुझं आयुष्य जग
तर त्यानंतर तिला दुसरा ई-मेल आला. त्यामध्ये रुपेश कुमार असा उल्लेख होता. त्यामध्ये म्हटले आहे की, ”तू आमच्या हिंदू धर्माला बदनाम करत आहेस. उर्फी जावेद तू तुझं आयुष्य जग, मात्र असं काय पुन्हा केलीस तर भर चौकात तुला गोळ्या घालीन अशी धमकी तिला देण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT