प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, नंतर अंगणात पुरुन वर फुलांची लावली रोपं

मुंबई तक

ADVERTISEMENT

bihar bhojpur murder love marriage mystery killed murder husband buried body courtyard planted flowers
bihar bhojpur murder love marriage mystery killed murder husband buried body courtyard planted flowers
social share
google news

Bihar Crime: बिहारमधील गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नुकताच घडली आहे. सहा महिने प्रेम केले त्यानंतर मोठ्या थाटामाटात लग्नही केले गेले. त्यानंतर काही दिवसात जुन्या अनैतिक संबंधातून (Immoral relationship) पतिची हत्या (Husband Murder) करुन तोच मृतदेह घराच्या अंगणात पुरण्यात आला होता. कहर म्हणजे मृतदेहाची (dead body) दुर्गंधी पसरु नये यासाठी त्यावर मीठही टाकण्यात आले होते. ही घटना घडली आहे बिहारमधील भोजपूर (Bihar Bhojpur) जिल्ह्यात. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल करताच मृतदेह अंगणातच पुरल्याचे सांगण्यात आले.

ADVERTISEMENT

प्रेमात पडलेल्या नेहानेच घडवली हत्या

भोजपूर जिल्ह्यातील ही खळबळजनक घटना घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मिथुन गिरी असे नाव आहे. तो वाहनचालक म्हणून काम करत होता. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधून गाडी घेऊन तो शिमल्याला जात होता. मागील 6 महिन्यांपूर्वी तो ट्रक घेऊन शिमल्याला गेला होता. तेथीलच एका व्यक्तीबरोबर तो काम करत होता. त्यावेळी त्याला तिथे नेहा भेटली होती. नेहाच्या प्रेमात पडल्यानंतर त्या दोघांनी लग्नही केले. आणि ती दोघं एकत्र राहू लागले.

हे ही वाचा >> Gadchiroli: भरवला विषाचा घास… घरातल्याच 2 बायकांनी संपूर्ण कुटुंबच संपवलं, विदर्भात खळबळ

सासरी गेला अन् घात झाला

याप्रकरणाची माहिती देताना मिथुन गिरीच्या वडिलांनी सांगितले की, तो दोन दिवसापूर्वीच सासरी गेला होता. त्यानंतरच मिथुनची हत्या करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कारण सासरच्या कुटुंबीयांकजे गेल्यावर मिथुनची पत्नी नेहा, तिचा जुना प्रियकर, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळूनच मिथुनची हत्या केली होती. असा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. कारण मिथुनच्या मृत्यूनंतर संपर्क झाला नसल्याने ते त्याच्या सासरी गेले होते. त्यावेळी घराच्या अंगणात खोदकाम करून त्यावर फुलांची झाडं लावण्याचं काम केलं जात होतं. त्यामुळेच त्यांना संशय आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता अंगणातच मिथुन गिरीचा मृतदेह पुरल्याचे लक्षात येताच तो त्यांनी मातीतून काढण्यास सांगितला.

अंगणातच पुरला मृतदेह

मिथुनच्या पत्नीचे लग्नापूर्वी एकाबरोबर अनैतिक संबंध होते असा दावा तिच्या सासरच्या मंडळींनी केला आहे. तिचे संबंध असल्यामुळेच मिथुनला गाडी घेऊन त्याला शिमल्याला पाठवण्यात आले. त्यानंतर पूर्वी संबंध असलेल्या डॉक्टराबरोबर तिचे पुन्हा सूत जुळाले होते. त्यामुळे त्या दोघांनी मिथुनच्या हत्येचा कट रचला आणि मिथुनची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह अंगणात पुरुन त्यावर फुलांची रोपं लावण्यात आली.

हे ही वाचा >> मैत्री, प्रेम आणि नंतर समलैंगिक संबंध, लग्न ठरलं अन् खुनी खेळ…

मृतदेहावर फुलांची रोपं लावली

तर दुसरीकडे पोलिसांच्या चौकशीत आरोपी पत्नी नेहाने पतीने सासरच्या घरी आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. त्याच्या आत्महत्येमुळे घाबरून त्याचा मृतदेह आम्ही अंगणात पुरला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्यामुळेच त्यांनी अंगणात पुरलेला मृतदेह बाहेर काढून तपास करण्यात आला.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT