Crime : भाजप नेत्याचा बापासमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार, घटनाक्रम ऐकून पोलिसही हादरले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

bjp leader rahi massom raza rape minor girl father killed shocking story from maharajaganj Uttar pradesh
bjp leader rahi massom raza rape minor girl father killed shocking story from maharajaganj Uttar pradesh
social share
google news

उत्तरप्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका भाजप नेत्याने मागास जातीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. हा संपूर्ण धक्कादायक घटनाक्रम पीडितेच्या वडिलांनी त्यांच्या डोळ्यादेखत पाहिला होता. त्यामुळे घटनेला विरोध करताच आरोपी भाजप नेत्याने पित्याला अज्ञातस्थळी सोडले होते. या प्रकरणात आता पित्याची हत्या झाली. या हत्येनंतर आता पोलिसांनी आरोपी भाजप नेता राही मासूम रजावर बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उघडकीस येताच शहरात खळबळ माजली आहे. (bjp leader rahi massom raza rape minor girl father killed shocking story from maharajaganj Uttar pradesh)

ADVERTISEMENT

मागास जातीच्या अल्पवयीन मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडीत मुलीचे कुटूंब हे संत नगर जिल्ह्यातील महाराजगंज शहरात भाड्याने राहतात. याच जिल्ह्याचे भाजप अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष आरोपी राही मासूम रजा आहेत. या भाजप नेत्याने मागास जातीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. ही संपूर्ण घटना बापाने डोळ्यादेखत पाहताच विरोध करायला सुरूवात केली होती. मात्र भाजप नेत्यांच्या साथिदारांनी बापाला अज्ञात ठिकाणी जाऊन सोडले होते. ही घटना 28 ऑगस्टला घडली होती. या घटनेनंतर पीडितेच्या पित्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र भाजप नेत्याच्या वरदहस्तामुळे पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेता, दोघांमध्ये मध्यस्थी घडवून आणत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता.

हे ही वाचा : Sonia Gandhi PM Modi : सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींकडे मागितला अजेंडा, पत्रात 9 मुद्दे कोणते?

दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून सुद्धा आरोपी भाजप नेत्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून पित्याने आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे पोलिसांचा बेजबाबरदारपणा उघड झाला होता. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या घटनेत अॅक्शन घेत आरोपी भाजप नेता राही मासूम रजावर 302 हत्या, 376 बलात्कार, 354 महिलेचा अपमान यासह 452,323, 504, 506 अंतर्गत बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच या गुन्ह्यासह या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.

हे वाचलं का?

या प्रकरणात पोलिस कमिश्नर डॉ. कौस्तुभ म्हणाले की, या घटनेची कसून चौकशी करण्यात येणार आहे. आणि आरोपीला देखील लवकरात लवकर अटक करण्यात येणार आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा : India Rename Bharat: देशाला असं मिळालं India नाव, बदलण्यासाठी कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रिया काय?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT