Amravati Crime : वहिनीवर दिराचे जडले प्रेम अन् पुतण्यालाच…

मुंबई तक

Amravati Crime News Marathi : अमरावती जिल्ह्यात वहिनीसोबत अनैतिक संबंध असलेल्या दिराने पुतण्याची हत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

ADVERTISEMENT

Amravati Deepak returned home after working as a labourer. During this time, his nephew lying in the cradle started crying loudly.
Amravati Deepak returned home after working as a labourer. During this time, his nephew lying in the cradle started crying loudly.
social share
google news

-धनंजय साबळे, अमरावती

Crime News of Amravati : अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे वहिनी आणि दिरामधील अनैतिक संबंधांमुळे एका 2 वर्षाच्या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला. काकाने निष्पाप पुतण्याला पाळण्यावरुन फेकले आणि लाथांनी मारहाण केली. त्यातच त्याच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला.

ही घटना 5 सप्टेंबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. फेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहरा बंदी परिसरात राहणाऱ्या दीपकचे वहिनी पूजासोबत अनैतिक संबंध होते. दोघांनाही एकत्र राहायचे होते, पण दिपक आपल्या वहिनीवर तिचा मुलगा मोठ्या भावाला देण्यासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे दोघांमध्ये सारखे वाद सुरू होते. पूजा आपल्या मुलाला सोडायला तयार नव्हती, असे सांगण्यात आले.

वाचा >> Maratha Reservation : मनोज जरांगेंनी निर्णयाची केली पोलखोल, शिंदे सरकार काय करणार?

काकाने 2 वर्षाच्या पुतण्याला तुडवून मारले

मिळालेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबर रोजी दीपक मजुरीचे काम करून घरी परतला. यावेळी पाळण्यामध्ये असलेला त्याचा पुतण्या जोरजोरात रडू लागला. पूजा तिच्या मुलाला गप्प करण्याचा प्रयत्न करत होती, पण निरागस मुलगा गप्प बसत नव्हता. याचा राग येऊन दीपकने पुतण्याला पाळण्यावरुन खाली फेकले आणि पायाने त्याला मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून निष्पाप मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

वाचा >> मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरूणाची आत्महत्या, तळ्यात उडी घेऊन संपवलं जीवन

मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला केली अटक

याबाबत पोलीस ठाण्याचे प्रमुख गोरखनाथ जाधव यांनी सांगितले की, आरोपी दीपक भोसले याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. तपासादरम्यान दीर आणि वहिनीचे अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना समजले. यातूनच निष्पाप बालकाची हत्या करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp