Crime : जीवाचं रान करून मोबाईल चोरट्यांशी भिडली, पण… विद्यार्थीनीच्या धाडसाची कहाणी
दोन मोबाईल चोरट्यांनी बाईकवरून तिचा पाठलाग करायला सूरूवात केली.यावेळी कीर्ति रिक्षाच्या एका बाजूला कोपऱ्यात बसली होती. आणि तिच्या हातात असलेल्या मोबाईलवर चोरट्यांनी नजर होती. यावेळी मसूरी पोलीस ठाणे हद्दीतील डासणा फ्लायओव्हर जवळ एनएच 9 वर मोबाईल चोरट्यांनी तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
Ghaziabad Btech Student kirti Singh Courage Story : देशात मोबाईल चोरीच्या दररोज अनेक घटना घडतात. या घटनेत काय नेहमीप्रमाणे मोबाईल चोरीची तक्रार दाखल होते आणि आरोपींचा शोध सुरु होतो.मात्र ही घटना काहीशी वेगळी आहे. या घटनेत बीटेक करणाऱ्या कीर्ति सिंहचा (kirti Singh) मोबाईला हिसकावण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रयत्नात तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिला 15 मीटर फरफरट नेण्यात आले होते. ज्यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती,मात्र इतकं होऊन सुद्धा तिने चोरांचा मनसुबा काही यशस्वी होऊन नव्हता. दरम्यान जरी कीर्ति चोरट्यांविरूद्धची लढाई जिंकली असली तरी रूग्णालयात आयुष्याच्या लढाईत मात्र हरली आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. (btech student kirti singh dead dragged from auto mobile snatcher ghaziabad uttar pradesh story)
ADVERTISEMENT
उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमध्ये (Ghaziabad) ही घटना घडली आहे. कीर्ति सिंह ही गाझियाबादच्या ABES कॉलेजमध्ये बीटेकच्या प्रथम वर्षात शिकत होती. हापुड जवळील आपल्या घरातून ती रोज गाझियाबादमध्ये कॉलेजला यायची. गेल्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला कीर्ति नेहमीप्रमाणे घरातून कॉलेजसाठी निघाली होती. कॉलेजमधले लेक्चर अटेंड केल्यानंतर दुपारी परतीच्या प्रवासात रिक्षाने हापूडला जात होती.
हे ही वाचा : Manoj Jarange: ‘या सरकारला एकाचा बळी घ्यायचाय तर…’, जरांगे-पाटलांना अश्रू अनावर!
या दरम्यान दोन मोबाईल चोरट्यांनी बाईकवरून तिचा पाठलाग करायला सूरूवात केली.यावेळी कीर्ति रिक्षाच्या एका बाजूला कोपऱ्यात बसली होती. आणि तिच्या हातात असलेल्या मोबाईलवर चोरट्यांनी नजर होती. यावेळी मसूरी पोलीस ठाणे हद्दीतील डासणा फ्लायओव्हर जवळ एनएच 9 वर मोबाईल चोरट्यांनी तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण कीर्तिने मोबाईल हातातून सोडूच दिला नाही. यानंतर चोरट्यांनी कीर्तिचा मोबाईल खेचून काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मोबाईलसह कीर्ति रस्त्यावर कोसळली होती. तरी देखील कीर्तिने काही मोबाईल हातचा सुटू दिला नाही आणि बाईकस्वारांनी तिला 15 मीटरपर्यंत फरफटत नेले. पण तरी देखील कीर्ति त्यांचा प्रतिकार करत राहिली.
या दरम्यान तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि ती जखमी झाली होती. यानंतर कीर्तिच्या मैत्रिणीने तिला रुग्णालयात दाखल करून कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली होती. कीर्तिने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न हाणून पडला पण यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती.
कीर्तिच्या शरीरात दोन फ्रॅक्चर झाले होते. यासोबत तिच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. तसेच रिक्षातून डोक्यावर पडल्याने तिच्या डोक्याचे हाडही तुटले होते, त्यामुळे तिला आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. साधारण 48 तास कीर्ति रूग्णालयात मुत्युची लढाई लढत होती. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आणि या लढाईत ती हरली आणि तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : MLA Disqualification case : ’31 डिसेंबरच्या आत निर्णय घ्या’, सुप्रीम कोर्टात नार्वेकरांना झटका
या घटनेचा तपास करणाऱ्या गाझियाबाद पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी आरोपी बोबील ऊर्फ बलवीरला अटक केली. तर दुसरा आरोपी जितेंद्र ऊर्फ जीतूने पळ काढला होता. या दरम्यान आज जितेंद्र आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली. या झटापटीत जितेंद्र गंभीर जखमी झाला आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
जितेंद्र विरोधात 13 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधाच हत्या आणि लुटमारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कीर्तिच्या घटनेनंतर फऱार झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर 25 हजाराचं बक्षिसाची रक्कम जाहिर केली होती. यासोबत या घटनेत निष्काळजीपणा केल्यामुळे एसएचओला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेने गाझियाबादमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT