Crime: शाळेत मुलींच्या बाथरूममध्ये सीसीटीव्ही, पुण्यातील धक्कादायक घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

cctv camera install on school girls washroom pune talgaon principle beating crime
cctv camera install on school girls washroom pune talgaon principle beating crime
social share
google news

राज्यात मुलींच्या वस्तीगृहात बलात्काराच्या आणि हत्येच्या घटना ताज्या असतानाच आता पुण्यातून (Pune) एक धक्कादाक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका नामांकीत शाळेत मुलींच्या बाथरूममध्ये (Girls Washroom) सीसीटीव्ही लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेवरून संतप्त होतं मुलीच्या पालकांनी शाळेतील मुख्याध्यापकाला पालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाळेतील मुलींच्या बाथरूममध्ये सीसीटीव्ही लावल्याच्या कारणावरून मुख्याध्यापकाला ही मारहाण करण्यात आली आहे. यासोबतच मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. मात्र अद्याप पोलिसांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही आहे. त्यामुळे पालकांमधून रोष व्यक्त होत आहे. (cctv camera install on school girls washroom pune talgaon principle beating crime)

ADVERTISEMENT

पुण्याच्या तळेगाव आंबी येथील एका नामांकीत शाळेतून धक्कादायक घटना समोर आली आहे. या शाळेतील मुलींच्या बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना हा प्रकार कळताच त्यांनी मुख्याध्यापकाराला मारहाण केली आहे.या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : Crime: तब्बल 8 महिने सुरू होती महिलेच्या अंर्तवस्त्राची चोरी, चोर निघाला….

व्हायरल व्हिडिओत सतंप्त पालकाकडून मुख्याध्यापकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका नामांकीत शाळेत घडलेली ही घटना आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाने मुलींच्या बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला असल्याचा आरोप करण्यात आला होता.याचा जाब विचारण्यासाठी काही मंडळी आणि पालक शाळेत दाखल झाले होते. या दरम्यान शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये धक्काबुक्की झाली होती.या धक्काबुकीतून नंतर मुख्याध्यापकाला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

पालकांनी या प्रकरणी तक्रारीचे पत्रही पोलसांना दिले आहेत. या पत्रातून शाळा प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित शाळा ही हिंदु सणांना सुटट्या देत नाही, शाळेमध्ये बायबल प्रार्थना केल्या जातात तसेच मुलींच्या बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, असे गंभीर आरोप पालकांनी शाळा प्रशासनावर करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणावर अद्याप शाळा प्रशासनाने काहीच प्रतिक्रीया दिली नाही आहे. तसेच पोलिासांनी देखील कोणतीच तक्रार अद्याप दाखल करून न घेतल्याने बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात आता पोलिल तक्रार दाखल करून काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा : Nanded Crime : करणने घरातल्या साडीने घोटला अर्जूनचा गळा, कारण ठरला मोबाईल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT