मैत्रिणीशी लग्नासाठी घेतले लिंग बदलून, नकार मिळताच वाढदिवसालाच जाळलं जिवंत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chennai he changed his gender marry his girlfriend girlfriend refused marriage burnt alive with petrol
Chennai he changed his gender marry his girlfriend girlfriend refused marriage burnt alive with petrol
social share
google news

Murder Case : चेन्नईतील थलंबूरमध्ये (Chennai, Thalmbur) एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राच्या वाढदिवसादिवशीची त्याची हत्या (Murder) केल्याची भयंकर घटना घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आरोपी हा त्याचा जवळचा मित्र होता, मात्र त्याने नंतर त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी लिंग बदल (Gender change) करून घेतले होते. मात्र त्यानंतर मृत नंदिनीने त्याच्याबरोबर लग्न करण्यास नकार दिल्यामुळे रागाच्या भरात नंदिनीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्यात आले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सांगितले की, नंदिनीला जिवंत जाळल्याप्रकरणी वेट्रिमरनला ताब्यात घेऊन अटक केले आहे. वेट्रिमरनने काही दिवसांपूर्वी लिंग बदल करुन घेतले होते. लिंग बदल करुन घेण्यापूर्वी त्याचे नाव पंडी मुरुगेश्वरी होते.

ADVERTISEMENT

दोघींमध्ये चांगली मैत्री

याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की, मुरुगेश्वरी आणि आर नंदिनी या दोघीही मधुराईमधील एका कन्या शाळेत शिकायला होत्या, त्यावेळेपासून त्या दोघींमध्ये चांगली मैत्री होती. त्यानंतर मुरुगेश्वरीने नंदिनीबरोबर लग्न करण्यासाठी लिंग बदल करून घेतले होते. मात्र त्यानंतर नंदिनीने त्याच वेट्रिमरनबरोबर राहण्यास नकार दिला होता, मात्र त्यानंतरही त्या दोघी एकमेकींच्या संपर्कात होत्या.

हे ही वाचा >> संसदेतील घुसखोर प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

दोघंही दिवसभर एकत्र

नंदिनीने आठ महिन्यापूर्वी कॉलेज पूर्ण केल्यानंतर तिने नोकरीसाठी चेन्नई गाठली होती. नंदिनी चेन्नईमध्ये राहत असताना आपल्या काकांसोबत राहत होती. मात्र ती दोघं एकमेकांच्या संपर्कात असल्याने शनिवारी वेट्रिमरनने नंदिनीला फोन करून भेटायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी नंदिनीला आपण काही वेळ एकत्र घालवू असंही वेट्रिमरनने सांगितले. ती दोघंही दिवसभर एकत्र फिरत कपड्यांची खरेदी करून त्यांनी एका अनाथालयालाही भेट दिली होती.

हे वाचलं का?

आधी गळा चिरला नंतर पेट्रोल ओतलं

त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, आरोपीने नंदिनीला घरी सोडायची तयार दाखवली. त्यानंत ती दोघंही घरी जात असताना एका निर्जनस्थळी गेल्यावर नंदिनीला वेट्रिमरनने तिला फोटो काढायले सांगितले. त्याचवेळी नंदिनीचे हात पाय बांधून तिच्या गळ्यावर ब्लेडने आणि हातावर वार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून तिथतन तो पळून गेला.

निर्जन रस्त्यावरच पेटवलं

नंदिनीवर पेट्रोल टाकून पेटवल्यावर तिने आरडाओरड केल्यामुळे अनेक नागरिक तिच्या मदतीसाठी धावून आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देऊन तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी नंदिनीने पोलिसांना वेट्रिमरनचा नंबर दिला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात बोलवण्यात आले, त्यावेळी त्याने मित्र असल्याचे सांगून तो काही वेळ रुग्णालयात थांबला आणि नंतर फरार झाला. नंदिनीचा मृत्यू झाल्यावर मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याल अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली.

ADVERTISEMENT

नंदिनीला संपवण्याचा घाट

नंदिनीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळूनही वेट्रिमरन शांत होता, त्याला कोणताही पश्चाताप वगैरे झाला नाही. त्याने शांतपणे सांगितले की, काही वर्षापूर्वी नंदिनीसाठी मुरुगेश्वरीने लिंग बदल करून घेऊन तो वेट्रिमरन नावाने वावरत होता. मात्र लिंग बदल करूनही नंदिनीने त्याच्याबरोबर राहण्यासाठी नकार दिला होता, तुझ्यासोबत माझे कोणतेच भविष्य नसल्याचे नंदिनीने त्याला स्पष्ट सांगितले होते. पोलिसांनी तपासानंतर हेही सांगितले की, नंदिनी चेन्नईत आल्यानंतर तिने त्याच्या ऑफिसमधील एकाबरोबर तिचे जवळचे संबंध निर्माण झाले होते, त्यामुळेच वेट्रिमरनने नंदिनीला संपवण्याचा कट रचला आणि तिला जिवंत जाळण्यात आले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Loksabha : ज्या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, तिथेच CM शिंदेंचा दौरा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT