पुण्यात क्रूर कांड, अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध? दिराने पळवून आणलं अन् नंतर वहिनीलाच…
Pune Crime: पुण्यात एक भयंकर घटना घडली आहे. ज्यामध्ये एका दिराने आपल्या वहिनी आणि तिच्या दोन मुलांची हत्या केली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
पुणे: पुणे शहरात एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या वहिनी आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांची गळा दाबून हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर तिघांची हत्या केल्यानंतर आपला गुन्हा लपविण्यासाठी तिघांचाही मृतदेह जाळण्याचा प्रयत्न आरोपीने केलं असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील पिसोळी येथील एका शेतात ही भयंकर घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी 30 वर्षीय आरोपी वैभव वाघमारे याला तात्काळ अटकही करण्यात आली आहे. (cruel scandal in pune suspected of having immoral relations with many men brother in law killed her sister in law and 2 childrens)
ADVERTISEMENT
आरोपी वैभव याची वहिनी आम्रपाली (वय 25 वर्ष) हिचे दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला होता. याच कारणावरून आम्रपालीशी झालेल्या वादानंतर वैभवने तिची आणि तिच्या दोन्ही मुलांची हत्या केली.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी कोंढवा परिसरात ही घटना घडली. आरोपी त्याच्या 25 वर्षीय वहिनी आणि इतर पुरुषांशी असलेल्या कथित संबंधांमुळे नाराज होता. यामुळे त्याने आपल्या मेव्हणीची हत्या घडवली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली
अधिक वाचा- Crime : सनकी पित्याने दोन विवाहित मुलींची केली हत्या; पत्नी आणि नातू गंभीर जखमी
कथित अनैतिक संबंधांवरून वाद, तिघांची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, चुलत दीर वैभव वाघमारे आणि आम्रपाली वाघमारे यांचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. साधारण वर्षभरापूर्वी आम्रपाली आपल्या पतीला सोडून चुलत दीर वैभवसोबत पुण्यात रहायला आली होती. यावेळी ती तिच्या दोन्ही मुलांना देखील सोबत घेऊन आली होती.
चुलत दिरासोबत असलेले प्रेमसंबंध यामुळे आम्रपाली ही वैभवसोबतच कोंढव्यातील पिसोळी भागात राहत होती. असं असताना मागील काही महिन्यांपासून वैभवला असा संशय येऊ लागला की, आम्रपालीचे इतर पुरुषांशी देखील अनैतिक संबंध आहेत. यामुळे त्यांच्यात काही दिवसांपासून वादही सुरू होते. मात्र काल (5 एप्रिल) वैभव आणि आम्रपाली यांच्यात टोकाचा वाद झाला. याच वादातून वैभवने आधी आम्रपालीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने सहा वर्षांची मुलगी रोशनी आणि चार वर्षांचा मुलगा आदित्य यांचीही गळा आवळून हत्या केली.
ADVERTISEMENT
अधिक वाचा- विकृतीचा कळस! अंध महिलेवर पतीसमोरच लैंगिक अत्याचार
त्यानंतर हे मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी या तिन्ही मृतदेहांना एकत्र जाळण्याचा घाट त्याने घातला. वैभवने हे तिन्ही मृतदेह खोलीसमोर असलेल्या शेतातल्या शेडमध्ये जाळण्यासाठी नेले. तिथे त्याने त्या शेडमध्ये असलेले कपडे, बेडशीट आणि लाकडं यांचा वापर मृतदेह जाळण्यासाठी केला. कपडे आणि मृतदेहाने पेट घेतला तेव्हा शेतात आगीचे लोळ दिसू लागले.
ADVERTISEMENT
त्यामुळे पिसोळीतल्या स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास पोलीस आणि अग्निशमन दल तिथं पोहोचलं आणि हा भयानक गुन्हा उघडकीस आला.
अधिक वाचा- वहिनीने दिराकडे केलं दुर्लक्ष…रागाच्या भरात भावाच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार
6 एप्रिल गुरुवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी पिसोळीतच राहणाऱ्या समीर मासाळ यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 2 तासातच पोलिसांनी आरोपी वैभवच्या मुसक्या आवळल्या. वैभववर भादंवि कलम 302 अंतर्गत खून करणं आणि कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करणं अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT