ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी पिता-पुत्र गेले तुरुंगात, ती आली परत; मग सापडलेला मृतदेह कुणाचा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

daughter whose father and son went to jail on the charge of murder turned out to be alive
daughter whose father and son went to jail on the charge of murder turned out to be alive
social share
google news

छिंदवाडा (मध्यप्रदेश): मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छिंदवाडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीची एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता (Missing) झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या हत्येच्या (Murder) आरोपाप्रकरणी बाप आणि मुलालाच अटक केली होती. मात्र, आता या प्रकरणात सर्वात आश्चर्यकारक घटना घडली आहे. ती म्हणजे. ज्या मुलीची हत्या झाल्याचे सांगितले जात होते ती जिवंत असून तिच्या मूळ घरी परतली आहे. एवढंच नव्हे तर ती प्रौढ झाली आहे. (daughter whose father and son went to jail on the charge of murder turned out to be alive then whose dead body was it)

ADVERTISEMENT

कुटुंबीयांचा राग मनात धरून मुलगी घरातून निघून गेली होती. सध्या ती उज्जैनमध्ये राहते, असे मुलीचे म्हणणे आहे. वडील आणि भावाला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. या प्रकरणात, मुलीचे वडील एक वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर घरी परतले होते. परंतु तिचा भाऊ वर्षानुवर्षे तुरुंगातच आहे.

घरी परतलेल्या तरुणीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तिचे म्हणणे आहे की, कोणत्या तरी मृतदेहाचा सांगाडा दाखवून तो माझाच आहे, असे सांगून वडील आणि भावाला खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2014 मध्ये अल्पवयीन मुलगी झालेली बेपत्ता

वास्तविक, हे प्रकरण मध्यप्रदेशमधील अमरवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगोडी चौकीचे आहे. सिंगोडी चौकी परिसरातील जोपनाळा गावातील मेंढपाळ असलेले शन्नू उईके यांची 15 वर्षीय मुलगी 2014 साली घरातून अचानक बेपत्ता झाली होती.

अधिक वाचा- नाशिक हादरलं… कंपनीच्या CEO ची भररस्त्यात गाडी अडवून निर्घृण हत्या

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर शन्नू उईके यांनी तिचा खूप शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी सिंगोडी पोलीस चौकी येथे आपली मुलगी कांचन ही बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. बेपत्ता झाल्यानंतर सात वर्षांनंतर पोलिसांना शन्नू उईके यांच्या घराजवळ खोदकाम केलं होतं.

ADVERTISEMENT

न्यायालयात सादर केलेल्या अहवालात पोलिसांनी म्हटले होते की, 13 जून 2014 रोजी अल्पवयीन मुलाचा भाऊ सोनू याने काठीने मारहाण करत आपल्या अल्पवयीन बहिणीची हत्या केली होती आणि नंतर वडिलांसह तिचा मृतदेह पुरून टाकला होता. दरम्यान, खोदकाम केल्यानंतर तिथे सांगाडा आणि बांगड्या सापडल्या असल्याचं कोर्टात म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

सुनावणीदरम्यान पिता-पुत्रानेही अल्पवयीन मुलीच्या हत्येची कबुली दिली होती. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तब्बल वर्षभरानंतर वडील जामिनावर बाहेर आले होते, पण मुलगा सोनू अजूनही तुरुंगात आहे.

मृत घोषित केलेली कांचन तर जिवंतच

मात्र, आता या प्रकरणात नवीच घडामोड घडली आहे. पोलिसांनी ज्या कांचन नावाच्या अल्पवयीन मुलीला मृत घोषित केलं होतं ती आता तिच्या घरी परतली आहे. ती आता प्रौढ झाली असून तिचे लग्नही झाले आहे.

अधिक वाचा- WhatsApp वर एक मेसेज अन् मुलगी दारात हजर… ठाण्यात सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

अनेक वर्षांनंतर कांचन जेव्हा आपल्या मूळ घरी पोहोचली तेव्हा गावात एकच खळबळ उडाली. त्याचवेळी आई-वडिलांनी आपल्या मुलीला जिवंत पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तर कांचन देखील यावेळी प्रचंड भावूक झाली होती. दरम्यान, ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे जवळजवळ अख्खा गाव कांचनला पाहण्यासाठी त्यांच्या घरासमोर जमा झाला होता.

कांचनने थेट गाठलं पोलीस स्टेशन, म्हणाली.. ‘मी जिवंत आहे’

मुलीने त्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांसह थेट सिंगोडी पोलीस स्टेशन गाठलं. मुलीने सध्याचे पोलीस स्टेशन प्रभारी धर्मेंद्र कुशराम यांना सांगितले की, जेव्हा ती 15 वर्षांची होती, तेव्हा तिने स्वतःच्या इच्छेने घर सोडले होते.

कांचनने पुढे सांगितले की, पोलिसांनी तिच्या हत्येत तिचे वडील आणि भावाला हकनाक गुंतवले आहे. एका खोट्या खून खटल्यात भाऊ तीन वर्षांपासून तुरुंगात आहे.

अधिक वाचा- रिक्षात अश्लील चाळे; प्रेमी युगुलाला हटकलं, प्रियकराने टाकला रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड अन्…

मुलीने यावेळी पोलिसांवर आरोप करताना सांगितले की, कोणता तरी सांगाडा दाखवून तिच्या वडिलांना आणि भावाला हत्येसाठी दोषी ठरवले गेले. पण मी जिवंत आहे. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी देखील तिला ओळखले आहे. कांचनने असंही म्हटलं की, पोलिसांच्या दबावाखाली येऊन वडील-भावाने हत्येची कबुली दिली होती.

वडील म्हणाले- ‘इन्स्पेक्टरने मागितलेले दोन लाख रुपये ‘

दुसरीकडे, मुलीचे वडील शन्नू उईके यांनी सांगितले की, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तत्कालीन उपनिरीक्षकांनी तिची आम्ही हत्या केली होती असा आरोप केला होता. तसेच हे प्रकरण संपवण्यासाठी निरीक्षकाने दोन लाख रुपयांची मागणीही केली होती. त्यावेळी आम्ही 121 हेल्पलाइनवर देखील कॉल केला होता. पण, आम्हाला मदत मिळाली नाही, मग मला आणि माझ्या मुलाला तुरुंगात पाठवण्यात आलं. मी जामिनावर बाहेर आहे, पण माझा मुलगा तुरुंगात आहे.’

Crime news police officer
पोलीस स्टेशन प्रभारी धर्मेंद्र कुशराम.

सध्याचे पोलीस स्टेशन प्रभारींचं म्हणणं काय?

सध्या पोलीस स्टेशनचे प्रभारी असलेले धर्मेंद्र कुशराम यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, ‘ही बाब 2014 सालची आहे. अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. नंतर तिच्या हत्येप्रकरणी वडील आणि भावाला दोषी ठरवून तुरुंगात पाठवण्यात आले होते. आता तीच मुलगी जिवंत परतली आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण गंभीर आहे. ज्याचा तपास केला जात असून यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले आहे.’ॉ

SSP Sanjiv
एसएसपी संजीव उईके

एएसपी यांनीही दिली माहिती

या प्रकरणी एएसपी संजीव उईके सांगतात की, 2014 साली अमरवाडा पोलीस ठाण्यात 363 चे प्रकरण समोर आले होते. अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. 2021 साली अल्पवयीन मुलीच्या हत्येबाबत तत्कालीन तपास अधिकाऱ्याने आपल्या अहवालात म्हटले होते आणि हत्येच्या आरोपाखाली वडील-भावाची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.

अधिक वाचा- 19 वर्षाच्या मुलीने केलेला 15 वर्षाच्या मुलावर बलात्कार, कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

ते पुढे म्हणाले की, आता तीच मुलगी जिवंत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याबाबत आम्ही न्यायालयीन कारवाई करू. डीएनए चाचणी देखील केली जाईल. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT