Pune: मुलीने दिलेल्या नकारामुळे नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, पुण्यात नेमकं काय घडतंय?
Pune Crime: तरूणीने लग्नासाठी दिलेला नकार जिव्हारी लागल्याने एका तरूणाने मुलीची बदनामी करण्यासाठी चक्क पुण्यातील नेत्यांनाच धमक्या देण्याचा उपद्व्याप सुरू केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
ADVERTISEMENT
पुणे: दिलजला आशिक भडकला आणि राजकीय नेत्यांना धमक्या देत सुटला. राजकीय व्यक्तींना विशेषतः पुण्यातल्या राजकीय नेत्यांना त्याने टार्गेट करणं हा त्याच्या गुन्ह्याचा पॅटर्न होता. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांचे त्यामुळे काही दिवस धाबे दणाणले होते. कोण होते हे नेते, हा दिलजला आशिक काय करायचा? आणि भाजप, मनसे आणि काँग्रेसचे नेते त्याच्या तावडीतून कसे सुटले याबाबत आपण जाणून घेऊया सविस्तर. (death threats to pune leaders due to girls refusal to marry what is actually happening in pune)
ADVERTISEMENT
मनसेचे नगरसेवक वसंत मोरे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, भाजपचे आमदार महेश लांडगे, भाजपचे गणेश बिडकर मुरलीधर मोहोळ असे सर्व पक्षीय नेते चिंतेत होते. कारणच तसं होतं कोणाला जीवे मारण्याची धमकी आली होती तर कोणाच्या नावे खंडणी वसुलीची माहिती समोर आली होती. या सर्व नेत्यांबाबत घडलेल्या घटनेचा पॅटर्न होता. हा पॅटर्न लक्षात घ्यायला हवा कारण आरोपी त्यामुळेच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
आरोपी एकतर्फी प्रेमातून करत होता भयंकर कृत्य
भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार आणि भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देत 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. लांडगेंनी मतदारसंघातील नागरीकांच्या मदतीसाठी सुरु केलेल्या परिवर्तन या हेल्पलाईन नंबरवर 4 एप्रिलला त्यासाठी मेसेज आला. पैसे दिले नाही तर डोक्यात गोळी घालून जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली होती. अज्ञात इसमाकडून हा मेसेज आला होता. लांडगे यांच्याकडे काम करणाऱ्या यश पवारने याविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
माजी मंत्री रमेश बागवेंच्या मुलाला धमकी
काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आणि माजी नगरसवेक अविनाश बागवे यांनाही अशीच धमकी मिळाली होती. 4 एप्रिलला दुपारच्या वेळेस अविनाश बागवे घरी असताना त्यांना आधी एक फोन आला आणि त्यानंतर मग मेसेज आला. 30 लाख रुपयांची खंडणी त्यांच्याकडे मागितली होती. आणि पैसे दिले नाहीत तर गोळी मारुन हत्या करण्याची, राजकीय कारकिर्द उध्वस्त करण्याची धमकी त्यांना देण्यात आली होती.
अधिक वाचा- वासनांध बायकोचं नवऱ्यासोबत भयंकर कृत्य.. नेमकं घडलं तरी काय?
“आम्ही 7 माणसं आहोत आणि जर आमच्यापैकी काहीजण पकडले गेले तर उरलेले लोक कार्यालय आणि घराच्या बाहेर असू” अशा शब्दात अविनाश बागवेंना भीती घालण्यात आली. त्यानंतर बागवेंनी क्राईम ब्रांचला याची माहिती दिली आणि तक्रार नोंदवली. खंडणीविरोधी पथकाने याची दखल घेतली आणि आरोपीचा शोध सुरू केला.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय गणेश बिडकरांना धमकी
“तुला राजकीय मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे” अशा शब्दात भाजपचे माजी नगरसवेक आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाणारे गणेश बिडकर यांना धमकी आली होती. रामनवमीच्या दिवशी म्हणजेच 30 मार्चला व्हॉट्सअॅप कॉलवरुन त्यांना धमकी देण्यात आली होती. इतकंच नाही तर त्यांना मराठी आणि हिंदी भाषेत शिवीगाळही करण्यात आली होती. पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकीही दिली होती. या अज्ञात व्यक्तीच्या कॉलनंतर पुण्याच्या सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली.
ADVERTISEMENT
वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
त्याआधीच, 7 मार्चला मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळीही 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि पैसे लवकर दिले नाही तर वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळांचा फोन हॅक करून बिल्डरला धमकी
भाजपचे पुण्यातले नेते पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या फोनवरुन एका बिल्डरला धमकीचा कॉल आणि पैशांची मागणी केल्याची माहिती समोर आली होती. हा बिल्डर मोहोळ यांचा मित्र होता. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोध सुरू केला. मोहोळ यांचा फोन हॅक करुन ही धमकी दिल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतर गुन्हे शाखेने महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरुन दोघांना अटक केली होती.
अधिक वाचा- मोमोज खाणाऱ्या पोलिसालाच उचललं, घडली भयंकर घटना..
पुण्यातल्या वेगवेगळ्या पक्षात तब्बल 5 नेत्यांना खंडणीसाठी फोन आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या व्यक्तीने धमकी देताना मागणी केलेली रक्कम मुलीच्या गाडीत ठेवण्याची सुचना दिली होती. प्रत्येकाकडून सुमारे 25 ते 30 लाख रुपयांची मागणी केली होती. तसंच या आरोपीचा पॅटर्न म्हणजे राजकीय नेत्यांना त्याने टार्गेट केलं होतं. म्हणून पोलिसांनी या सर्व तक्रारींमध्ये अधिक लक्ष घातलं. वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये आणि पोलिसांचे वेगवेगळे विभाग या व्यक्तीचा शोध घेत होते.
मुलीचा लग्नाला नकार अन्…
अखेरीस 6 एप्रिलला या प्रकरणात पुणे पोलिसांनी घोरपडी भागात राहणाऱ्या इम्रान शेख या तरुणाला अटक केली. इम्रान विवाह नोंदणी म्हणजेच मेट्रीमोनियल वेबसाईट चालवतो. या कामानिमित्ताने त्याच्याकडे एका मुलीचं प्रोफाईल आलं. ती इम्रानला आवडली आणि त्याने स्वतःच या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण मुलीने नकार दिला.
अधिक वाचा- अॅडल्ट वेबसाईटवर फोटो लीक करण्याची धमकी, ‘कला’ फेम अभिनेत्रीचा गंभीर आरोप
मग हा एकतर्फी प्रेम करणारा आशिक चवताळला आणि त्याने त्या मुलीच्या बदनामीचा कट केला. सुरुवातीला इम्रानने तिची बदनामी करण्यासाठी तिचे फोटो आणि मोबाइल नंबर सोशल मीडियावर अपलोड केले. पोलीस मुलीवर कारवाई करतील असा तर्क त्याने लावला होता. पण इम्रानला वाटत होतं तसं काहीच झालं नाही. मग त्याने वेगळा डाव टाकला. या मुलीच्या नावे राजकीय नेत्यांना धमक्या द्यायला सुरुवात केली. फोनवर धमकी देताना त्या मुलीच्या गाडीत पैसे ठेवा असं इम्रान सांगायचा. इम्रानचं प्रेम नाकरणाऱ्या त्या मुलीची बदनामी होईल, तिला त्रास दिला जाईल एवढाच हेतू डोळ्यासमोर ठेवून त्याने हा सर्व कट रचला होता.
मनसेचे नेते वसंत मोरे यांना दिलेल्या धमकी प्रकरणात इम्रानला अटकही झाली होती. पण तो जामीनावर सुटला त्यानंतर त्याने काँग्रेसचे अविनाश बागवे आणि भाजपचे महेश लांडगे यांना धमकी दिली. त्यानंतर पुन्हा त्याला पुणे पोलिसांनी अटक केली. अखेरीस या दिलजल्या आशिकला आता पोलिसांचा पाहुणचार घ्यावा लागतो आहे.
ADVERTISEMENT