आधी मैत्री नंतर लग्नाचे आमीष दाखवून…,घटनाक्रमाने पोलीसही हादरले
दिल्लीत एका घटनेत आरोपीने तरूणींशी मैत्री करून त्यांना लग्नाचे आमीष देऊन लुबाडण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी गोव्यातून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची नुकतीच दहाड ही वेबसीरीज रिलीज झाली. या सीरीजमधील सायको किलर तरूणींशी मैत्री करून त्यांना लग्नाचे आमीष देऊन पळवून नेत त्यांचा बलात्कार करून लूबाडून हत्या करायचा, असे संपूर्ण कथानक आहे. याच कथानकाशी मिळती जुळती घटना आता दिल्लीत घडली आहे. या घटनेत आरोपीने तरूणींशी मैत्री करून त्यांना लग्नाचे आमीष देऊन लुबाडण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी गोव्यातून आरोपीला ताब्यात घेतले आहे. (delhi crime police arrested accused of cheating air hostes for money)
ADVERTISEMENT
मेट्रीमोनियल साईटवर भेट…
डीसीपी एय़रपोर्ट देवेश कुमार मेहला यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपुर्वीच एका महिला एअऱ होस्टेसने आयजीआय एअरपोर्टमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने एका तरूणाने 18 लाख रूपयांचे सोन्याचे दागिने आणि एटीएमकार्ड सह इतर महागडे सामान घेऊन पळ काढल्याची तक्रार दाखल केली होती. आरोपी तरूणाने तिला लग्नाचे आमीष देऊन दिल्लीत लग्नाच्या फक्शनसाठी बोलावले होते. या दरम्यान आरोपीने पीडितेला लुबाडत पळ काढला होता. विशेष म्हणजे 15 दिवसापुर्वीच त्या दोघांची भेट मेट्रीमोनियल साईटवर झाली होती.
या तक्रारीनंतर देवेश कुमार मेहला यांनी या प्रकरणी तपासाची टीम गठीत करून आरोपीच्या मागे लावली. तब्बल 10 दिवस या घटनेचा तपास करण्यात आला. या तपासानंतर आरोपी अंशुल जैनला पोलिसांनी गोव्यातून ताब्यात घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून तरूणीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. मात्र गिफ्ट आयटम आरोपीकडे सापडले नाही.
हे वाचलं का?
राजस्थान, हरियाणामध्ये तक्रार दाखल
आरोपी अंशुल जैनची कसून पोलीस चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपीवर उदयपुरमध्ये आधीच एक तक्रार दाखल होती. त्याने एका घटस्फोटीत महिलेशी मैत्री करून तिला लग्नाचे आमीष देऊन तिची फसवणूक केली होती. आरोपीने एअर होस्टेसला हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं आणि तिचे सोन्याचे दागिने आणि महागडे सामान घेऊन पळ काढला होता. आरोपीवर उदयपुरसह गुडगावमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा लुबाडायचा महिलांना
आरोपी हा मेट्रीमोनियल साईटवरून घटस्फोटीत महिला आणि ब्रेकअप झालेल्या मुलींचा शोध घ्यायचा.एकदा तरूणी ठरली की तिच्याशी इंग्रजीत बोलायचा, त्यानंतर एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक असल्याचे भासवायचा. त्यानंतर महिलांना भेटायला बोलवयाचा आणि गाडीत बसवायता.नंतर गाडी पक्चर झाल्याचा बहाणा करायचा आणि पळ काढायचा. विशेष म्हणजे ज्या गाडीतून आरोपीवर ही संपूर्ण घटनाक्रम करायचा ती गाडी चोरीची होती. आरोपीच्या संपर्कात अनेक तरूणी होत्या. या घटनेने शहर हादरलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT