Viral Video: पठ्ठ्याला चढला 'पुष्पा'चा फिव्हर! अल्लू अर्जुन समजून चाहत्यांनी केली तुफान गर्दी अन् घडलं...
Allu Arjun Die Hard Fan Viral Video: सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कमी वेळात 500 कोटींहून अधिकची कमाई करणारा चित्रपट म्हणून 'पुष्पा 2' ची नोंद झालीय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अल्लू अर्जूनच्या जबरा फॅनचा भन्नाट व्हिडीओ होतोय व्हायरल
अल्लू अर्जून समजून चाहत्यांनी थिएटरजवळ केली तुफान गर्दी
त्या थिएटरबाहेर नेमकं घडलं तरी काय?
Allu Arjun Die Hard Fan Viral Video: सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कमी वेळात 500 कोटींहून अधिकची कमाई करणारा चित्रपट म्हणून 'पुष्पा 2' ची नोंद झालीय. संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरित एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याने या चित्रपटाला गालबोट लागलं होतं. याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या पुष्पाचीच हवा आहे. अशातच एका पठ्ठ्याने पुष्पा 2 चित्रपटातील अल्लू अर्जूनसारखाच पोशाख करून एका थिएटरच्या बाहेर भन्नाट पोज दिल्या. थिएटरच्या बाहेर जणू काही अल्लू अर्जूनच आला आहे, असं चाहत्यांना वाटल्यानं एकच गर्दी उसळली. या डुप्लिकेट अल्लू अर्जुनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
पुष्पाराज बनून रस्त्यावर उतरला जबरा फॅन
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, अल्लू अर्जूनच्या गेट अपमध्ये एका तरुणाने कारच्या डॅशबोर्डवर चढून भन्नाट पोज दिल्या. यावेळी या तरुणाची पुष्पाराजची क्रेझ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तरुणाच्या पुष्पाराज अदा कॅमेरात कैद झाल्या असून इंटरनेटवर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अल्लू अर्जूनच्या या डाय हार्ड फॅनने साडी-ब्लाऊज घालून चेहऱ्यावर पुष्पाराजचं मेकअप करून चाहत्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. गळ्यात लिंबूची माळ घालून या पठ्ठ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.
हे ही वाचा >> Vijay Shivtare: "मंत्रिमंडळात शेवटपर्यंत नाव होतं माझं, अचानक..."; आमदार विजय शिवतारेंच्या विधानामुळे खळबळ
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: छगन भुजबळ राष्ट्रवादीला करणार बायबाय? अजितदादांची सोडणार साथ? मोठी अपडेट आली समोर
व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
अल्लू अर्जूनच्या जबरा फॅनचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला. एका नेटकऱ्याने म्हटलं, भाई शानदार दिसत आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, सुपर-डुपर पुष्पाराज. अन्य एका नेटकऱ्याने लिहिलं, खाली उतर भावा, नाहीतर खाली पडशील. 5 डिसेंबरला रिलीज झालेल्या पुष्पा 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 113 वर्षांच्या इंडियन सिनेमाच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही. म्हणजेच एखाद्या चित्रपटाने सुरुवातीलाच 250 कोटी रुपयांची ओपनिंग करून गल्ला जमवला. पुष्पा 2 ने पहिल्याच दिवशी 294 कोटी रुपयांची कमाई केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT