NIAने उधळला ISISचा कट! ड्रोन हल्ला, IED स्फोट अन्…
नआयएकडून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या विरोधात सगळ्यात मोठी कारवाई महाराष्ट्र आणि कर्नाटकात करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून दहशतवाद्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ISIS Terror Module : राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने (NIA) दहशतवाद्याने केलेले सगळेच प्लॅन उद्ध्वस्त केले आहेत. त्यांनी रचलेल्या भयंकर कटाचा पर्दाफाशही करण्यात आला आहे. दहशतवादी (terrorist) संघटनेकडून भारतात हल्ला करण्याचे मोठे कट त्यांनी रचले होते. गोळीबार आणि बॉम्ब हल्ले (Bomb attacks) करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. मात्र दहशतवाद्यांचे हेतूच एनआयएकडून उद्ध्वस्त करण्यात आले. देशातील 44 ठिकाणी छापे टाकून 15 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मास्टरमाईंड; साकिब नाचन
एनआयएकडून फक्त दहशतवाद्यानाच फक्त पकडण्यात आले नाही तर मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, धोकादायक आणि धारदार शस्त्रे, महत्वपूर्ण कागदपत्रे, स्मार्ट फोन आणि अनेक डिजिटल उपकरणंही जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांनी मुंबईसह देशातील महत्वाच्या अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया करण्याचे प्लॅन आखला होता. या सर्व दहशतवादी मॉड्यूलचा मास्टरमाईंड म्हणून साकिब नाचनची असल्याचे एनआयएकडून सिद्ध करण्यात आले आहे. बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ असलेल्या नाचनचा 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातही त्याचा हात होता. त्याला न्यायालयाने दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा ठोठवली आहे.
हे ही वाचा >>Crime : आरोपीचं सैतानी कृत्य! अल्पवयीन मुलीला नग्न करून अंगावर फेकलं ॲसिड, नंतर…
सगळ्यात मोठी कारवाई
एनआयएकडून दिलेल्या माहितीप्रमाणे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या विरोधात सगळ्यात मोठी कारवाई करत शनिवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्रातील पडघा-बोरिवली, ठाणे, मीरा रोड, पुणे आणि कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एकाच वेळी 44 ठिकाणी छापे टाकले होते. याच काळात एनआयएकडून 15 आरोपींना दहशतवादी कारवाया केल्या प्रकरणी अटक केली आहे.
हे वाचलं का?
पडघा-बोरिवलीत कामं
एनआयएच्या तपासानुसार दहशतवादी कारवायातील आरोपींनी परदेशातील त्यांच्या म्होरक्यांच्या सुचनेनुसार भारतात काम केले आहे. ISIS चा हिंसक आणि विध्वंसक अजेंडा राबवण्यासाठीच या प्रकरणातील आरोपी सक्रिय झाले होते. अटक करण्यात आलेले दहशतवादी हे पडघा-बोरिवलीमधून काम करत होते. बोरिवलीमधून काम करताना त्यांनी मोठ्या कटचा प्लॅन आखला होता असंही एनआयएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिहादचे प्रशिक्षण
दहशतवाद्यांकडून मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी दहशतवाद्या कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांना परदेशातूनही पैसा मिळत होता. गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून आणण्यासाठी त्यांनी ड्रोन हल्ल्याचीही तयारी केली होती. त्यासाठी दहशतवाद्यांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षणही दिले जात होते. या प्रकरणातील आरोपींना ठाण्यातील पडघा गावामध्ये ठेवण्यात आल्याचे आता समोर आहे. त्यांचा ज्या तरुणांवर प्रभाव पडला होता, त्यांना तिथे आणून जिहाद म्हणजे काय त्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
ADVERTISEMENT
कारवायांचा भांडाफोड
इसिसच्या या मॉडेलाचा प्रमुख हा साकिब नाचन हाच असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले आहे. दहशतवादी संघटनेत सहभागी होणाऱ्या अनेक तरुणांना साकिब नाचन हाच शपथ देत होता. ज्या दहशतवादी संघटनेकडून भारताविरोधा कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात होता, त्या संघटनेतील दहशतवाद्यांच्या मागावर एनआयए गेल्या काही दिवसांपासून होते. त्यामुळे आता अनेक ठिकाणी छापेमारी करून दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. एनआयएच्या कारवाईमुळे इसिसच्या दहशदवादी कारवायांचा भांडाफोड झाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> आधी होती अलका, नंतर बनला अस्तित्व! बहिणीच्या मैत्रिणीसोबत थाटला संसार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT