ड्रग्स तस्कर ललित पाटीलच्या कशा आवळल्या मुसक्या?, पोलिसांनी सांगितली Inside Story
गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करी प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या मुसक्या बंगळुरु-चेन्नई परिसरातून ताब्यात घेतले असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात तो अगजी बरोबर सापडला आहे. त्यामुळे पुढील कारवाई काय असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
Lalit Patil: ड्रग्ज तस्कर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. बंगळुरू आणि चेन्नई (Bangalore and Chennai) परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सापळा रचून आणि वेगवेगळ्या टीमच्या आधारे ललित पाटीलच्या मागावर राहून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात (Court) हजर केले असता त्याला सोमवापर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आल्याचे ड्रग्ज तस्कर (Drug traffickers) प्रकरणात मुंबई पोलिसांच्या साकीनाका पोलिसांनी (Sakinaka Police) मोठी कारवाई करत ड्रग्ज तस्करीतील मोठा आरोपी ताब्यात घेतल्यानंतर आता अनेक गोष्टी बाहेर येणार असल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
मी पळलो नाही तर…
ललित पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर ललित पाटीलने म्हटले आहे की, मी पळलो नाही तर मला पळवलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण या ड्रग्ज प्रकरणात अगजी 10 ग्रॅमपासून ते 150 किलो ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले होते. जवळ जवळ 300 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ ताब्यात घेऊन 15 आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या.
हे ही वाचा >> Mumbai लोकलमधून 17 वर्षीय गर्लफ्रेंडचं अपहरण अन् साताऱ्यात उलगडलं सारं गुपित!
ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती मोठी
मुंबईचे पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, ललित पाटील याला बंगळुरू आणि चेन्नईमधून अटक केली असली तरी या प्रकरणात आणखी कोण कोण आरोपी आहेत त्याची चौकशी केली जाणार आहे. कारण ड्रग्ज प्रकरणात पुणे, नाशिक, गुजरात आणि मुंबईत अशी कारवाई झाली असल्याने हे ड्रग्ज प्रकरणाची मोठी व्याप्ती असल्याचेही त्यांनी सांगितले. ललित पाटील याला अटक केली असल्यामुळे आणि आता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे त्यानंतर आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता आहे.
पुणे ते बंगळुरू प्रवास कसा
ड्रग्ज तस्कर ललित पाटील गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्यामुळे त्याच्या मागावरच पोलीस होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून त्यांनी ललित पाटील याला पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण पुणे, नाशिकमधून सुरु झाले असले तरी ललित पाटील याला बंगळुरू आणि चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट! डीए 4 टक्क्यांनी वाढला; किती वाढणार पगार?
पोलीस कोठडीनंतर काय?
ललित पाटील याला बंगळुरूमधून अटक करण्यात आली असली तरी तो बंगळुरूपर्यंत पोहचला कसा असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे त्याच्यामागे हात कोणाचा आहे असा प्रश्नही उपस्थित केला जात असल्याने त्याच्या नंतर आता मुंबई पोलीस आणखी काय कारवाई करणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT