Lalit Patil: ललितच्या महिला मैत्रिणी अन्… नवा ट्विस्ट; ‘त्या’ 2 महिला नेमक्या कोण?
पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या ललित पाटीलच्या नाशिकमधील दोन मैत्रिणींना पोलिसांनी अटक केली. मैत्रिणीने त्याला 25 लाख रुपये दिल्याचे पोलीस तपासात निष्पण्ण झाले आहे.
ADVERTISEMENT
Lalit Patil : पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) ड्रग्ज माफिया (Drugs Smuggler) ललित पाटील (Lalit Patil) पसार झाल्यानंतर त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर ललित पाटीलला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं तयार करुन त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आली. ससूनमधून तो फरार झाल्यापासून पोलीस त्याचा कसून शोध घेत असतानाच बंगळुरु आणि चेन्नई (Bangalore and Chennai) परिसरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आता त्याच्या दोघी मैत्रिणींना (2 Friends) पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आता आणखी काही खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
फरार होण्यासाठी मदत
ललित पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला फरार होण्यासाठी कोण कोण मदत करत होते. त्यांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यातच आता ललित पाटीलच्या मैत्रीणींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आता या प्रकरणाता आणखी ट्विस्ट वाढले आहे. ललितच्या मैत्रिणीने त्याला 25 लाख रुपये दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा >> Manoj Jarange Patil: ‘राजकारण्यांचे डाव उधळून लावले’, जरांगे पाटलांनी नेमकं ते सांगितलं
‘त्या’ दोन महिला कोण?
ललित पाटीलला मदत करणाऱ्या प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोन महिलांना नाशिक पोलिसांनी पुणे पोलिसांकडे स्वाधिन केले आहे. या दोघीनी ललित पाटीलला फरार होण्यासाठी मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले असून आता त्यानुसार आता तपास करण्यात येत आहे. या महिलांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत असून आणखी काही माहिती उपलब्ध होते का त्याचा प्रयत्नही पोलीस करत आहेत.
ललित पाटलचा मोठा प्लॅन
ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र पळून जाण्यासाठी त्याला कोण कोण मदत करत होते. त्याचाही तपास पोलीस करत होते. त्यातच आता ललित पाटीलच्या नाशिकमधील मैत्रिणीकडून त्याने 25 लाख रुपये घेतले होते. ते पैसे घेऊन तो श्रीलंकेत ललित पाटील पसार होण्याच्या तयारीत होता. मात्र आता त्याला ताब्यात घेतल्यानंतर ललितच्या मैत्रिणींनी त्याला पसार होण्यासाठी मदत केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पुणे पोलिसांकडून दोघींना अटक करण्यात आले आहे.
हे ही वाचा >> ‘तुम्ही बेजबाबदार वक्तव्य का करता?’, पॅलेस्टाईनच्या वक्तव्यावरून शरद पवार-भाजपचे युद्ध
रक्कम आणि दागिने
ड्रग्ज माफिया ललित पाटील हा पुण्यातून फरार झाल्यानंतर तो नाशिकला एका महिलेकडे दिवसभर थांबल्याचे समोर आले आहे. या महिलेचा गुन्हेशाखा युनिट-1 ने शोध घेऊन तिला अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात दिले. या महिलेकडे 5 लाख, 12 हजार रूपये किंमतीची 7 किलो चांदी मिळाली आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर ललित पाटील याने चांदी घेऊन न जाता 25 लाख रूपये अशी रोख रक्कम घेऊन गेल्याचे सांगणयात आले. ही रक्कम भूषण पाटील याने या महिलेकडे दिल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT