गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग, 25 लाख हुंडा… विमानतळावर पोहोचताच नवऱ्याने काढला पळ
पतीने आपल्या पत्नीला गोवा विमानतळावर (Goa airport) सोडून पळ काढल्याची धक्कायादक घटना उघडकीस झाली आहे
ADVERTISEMENT
Crime :
ADVERTISEMENT
मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख झालेल्या अन् नुकतचं लग्न झालेल्या एका पतीने आपल्या पत्नीला गोवा विमानतळावर (Goa airport) सोडून पळ काढल्याची धक्कायादक घटना उघडकीस झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे जोडप हरियाणाचं आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी हरियाणातील फरिदाबादच्या सेक्टर-8 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी पती आणि त्याच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Husband left his wife at the Goa airport and ran away.)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वधूचे कुटुंब हरियाणातील फरिदाबादचे तर वराचे कुटुंब हिसारमधील आहे. मुलगा अबीर वैद्यकीय शिक्षण घेतो. तर त्याचे वडील अरविंद गुप्ता आणि आई आभा गुप्ता दोघेही डॉक्टर आहेत. दोघांचही हिसारमध्ये हॉस्पिटल आहे. मुलगा आणि मुलीची मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही भेटले, प्रेमात पडले अन् लग्नाचा निर्णय घेतला. कुटुंबियांनीही या लग्नाला संमती दिली.
chandrapur : बायको सोडून गेली! बापाचं हादरवून टाकणारं कृत्य, मुलाचा…
मुलीच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत काय माहिती दिली?
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरपुड्यानंतर मुलाकडील मंडीळींच्या वेगवेगळ्या मागण्या समोर येऊ लागल्या. आम्हीही त्या पूर्ण करत गेलो. लग्नाच्या चर्चेदरम्यान मुलाच्या पालकांनी आमच्यासमोर एकुलत्या एक मुलाचे डेस्टिनेशन वेडिंग करण्याची इच्छा बोलून दाखविली. गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन झाले. रिसॉर्टचा खर्च दोन्ही पक्ष मिळून करण्याचा निर्णय झाला.
लग्नापूर्वी अचानक एक दिवस अद्याप पैसे मिळाले नसल्याचे सांगून मुलाकडील मंडळींनी 25 लाख रुपयांची मागणी केली. पुढे लग्नाचे विधी सुरु असतानाच अचानक मुलाने बीएमडब्ल्यू गाडीची मागणी केली. तसंच मागणी पूर्ण झाल्यानंतरच मुलीला सोबत घेवून जाऊ असं सांगितलं. यावर दिल्लीत जाऊन 2 ते 3 महिन्यात मागणी पूर्ण करु असं आश्वासन दिल्यानंतर ठरल्याप्रमाणे लग्न पार पडलं.
ADVERTISEMENT
मात्र लग्न होताच मुलाकडील मंडळींनी रिसॉर्टवरुन गुपचूप काढता पाय घेतला. त्यांनी रिसॉर्टमध्ये त्यांच्या हिस्स्याचे पैसे भरले नाहीत. रिसॉर्ट व्यवस्थापनाने मुलीकडील लोकांना कैद करुन ठेवलं. कसं तरी नातेवाईकांना सांगून 30 लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले अन् स्वतःची सुटका करुन घेतली.
ADVERTISEMENT
18 बॉयफ्रेंड, 1 नवरा अन् कोट्यावधींची फसवणूक : महिला अशी अडकवायची सापळ्यात
लग्नानंतर वराने विमानतळावरुनच काढला पळ :
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर चेक इन केल्यानंतर मुलगा ट्राउजर बदलण्याच्या बहाण्याने तेथून गायब झाला.आम्ही गोवा पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही पाहिले. त्यात हा मुलगा विमानतळाच्या बाहेर पळताना दिसत होता. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत फरिदाबादच्या सेक्टर-8 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की लग्न ठरल्यापासून आतापर्यंत त्यांचा सुमारे 2 कोटी रुपये खर्च झाले आहेत. पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT