Love मॅरेजनंतरही बायको फिरत होती दुसऱ्यासोबत, नवऱ्याने मागून जाऊन..
एक महिला जिने आधी प्रेमविवाह केला होता. ती एका भलत्याच तरुणासोबत फिरत असल्याचं तिच्या पतीने रंगेहाथ पकडलं. ज्याचा व्हिडीओ देखील त्याने शूट केला आहे. आता हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो स्टेशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. पत्नी आपल्या कथित प्रियकरासोबत हातात हात घालून जेव्हा फिरत होती तेव्हाच तिच्या पतीने तिला रंगेहाथ पकडल्याचा आता दावा केला जात आहे. तिचा पाठलाग करणाऱ्या पती जेव्हा तिला दिसला तेव्हा महिलेला प्रचंड राग आला आणि तिने भांडण सुरू केले. यादरम्यान पतीने देखील तिला शिवीगाळ करणं सुरू केलं. (husband caught red handed wife she was going around with strange young man video going viral)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, दिल्ली मेट्रो स्टेशनवर एक महिला तिच्या कथित प्रियकराचा हात धरून फिरत असल्याचा व्हिडिओ तिच्या पतीने मागून शूट केला आहे. यावेळी मागून चालणारा नवरा कोणाला तरी विचारतो, “काका, मला इथे कोणाची मदत घ्यायची असेल तर कोणाकडून घ्यायची? कारण इथे बघा ती माझी बायको आहे आणि ती मला सोडून पळून गेली आहे. आता बघा ती तिच्या प्रियकराचा हात धरून हिंडत आहे. मी खूप दिवसांपासून तिला फॉलो करत आहे. आज मी तिला रंगेहाथ पकडले.”
स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून चालणारी व्यक्ती त्याला सल्ला देतो की, “फोन कर लो उसे…” यावर महिलेचा नवरा असल्याचा दावा करणारा तरुण म्हणतो, “ती फोन उचलत नाही, तिने मला ब्लॉक केले आहे आणि इकडे ती दुसऱ्यासोबत हिंडत आहे.”
हे वाचलं का?
दरम्यान, दुसरी व्यक्ती त्याला म्हणते की, पुढे जाऊन तू तुझ्या पत्नीला थांबव. तोपर्यंत ती महिला तिच्यासोबत असलेल्या तरुणासोबत काही वस्तू घेण्यासाठी दुकानात थांबते. मग नवरा तिला हाक मारतो आणि म्हणतो, “झालं का?… फिरून झालं का?…”
हे ही वाचा >> Wife Swapping : ‘तू माझ्या मित्रासोबत झोप, मी त्याच्या पत्नीसोबत…’, उच्चभ्रू सोसायटीतील घटना
हे ऐकून महिलेच्या चेहऱ्यावरचा रंगच पालटतो.. पण तात्काळ स्वत:ला सावरत ती म्हणते, “हो, झालं फिरून… तर काय झालं?” नवरा म्हणतो, ‘मी तुझा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे… आता ये तू कोर्टात…’
ADVERTISEMENT
यानंतर महिला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती म्हणजेच पती-पत्नी यांच्यात भांडण आणि हाणामारी सुरू होते. यादरम्यान, घटनास्थळी उपस्थित लोक हस्तक्षेप करतात, त्यावेळी तरुण म्हणतो की, “हिने पळून जाऊन माझ्याशी लग्न केले… प्रेमविवाह केल्यानंतर आता माझे जीवन नरक बनले आहे…” तर ती महिला म्हणते की, “मी घटस्फोट घेणारच आहे…”
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Kirit Somaiya यांचा कथित आक्षेपार्ह Video Viral, ‘सामना’ने ‘कशी’ दिली बातमी?
व्हिडिओमध्ये तरुण दावा करत आहे की, तो बुराडी सुलतानपुरीचा रहिवासी आहे. तो घटनास्थळी उपस्थित लोकांना या वादाचा व्हिडिओ व्हायरल करण्यास सांगतो. यानंतर पत्नीला पकडून तो दिल्लीतील नांगलोई पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याबाबतही बोलतो.
आता सोशल मीडिया यूजर्स पती-पत्नीमधील कथित वादाचा हा व्हिडिओ वेगवेगळ्या कॅप्शनसह शेअर करत आहेत. तसेच या वादाच्या बाजूने आणि विरोधात भाष्य केले जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT