Crime :नवऱ्याच्या निधनानंतर बायकोने मित्रासोबत मिळून…, घटनाक्रम पाहून पोलीसही चक्रावले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

husband death wife along with her friend young man threat and false case nagaur rajsthan crime story
husband death wife along with her friend young man threat and false case nagaur rajsthan crime story
social share
google news

एखाद्या महिलेच्या नवऱ्याचे निधन झाले की, तिला आर्थिकरीत्या आणि सामाजिकरीत्या समाजात वावरणे खुपच कठीण जाते. मात्र या घटनेत भलताच प्रकार घडला आहे. नवऱ्याच्या निधनानंतर बायकोने मित्रासोबत मिळून धक्कादायक घटना घडवून आणली आहे. महिलेने मित्रासोबत मिळून एका युवकाला तब्बल 19 लाखांना फसवले आहे. या प्रकरणात आता पीडित तरूणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (husband death wife along with her friend young man threat and false case nagaur rajasthan crime story)

ADVERTISEMENT

राजस्थानच्या नागौर येथे राहणाऱ्या माया नावाच्या महिलेच्या नवऱ्याचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. या निधनानंतर मायाने आपल्या मित्रासोबत मिळून एका तरूणाला जाळ्यात फासायला सुरुवात केली होती. यासाठी मायाने एका तरूणासोबत ओळख वाढवली होती. या ओळखीनंतर दोघांमध्ये फोनवर तासनतार गप्पा सूरू झाल्या होत्या. या गप्पानंतर दोघांनी एकमेकांना भेटायलाही सुरुवात केली होती. अशाप्रकारे हळुहळू माया तरूणाला आपल्या फासत चालली होती.

हे ही वाचा : ‘घरी एकटी असली की भाऊ करतो बलात्कार, आई म्हणते ‘गप्प रहा’; पीडितेची वेदनादायक कहाणी

तरूणाची महिलेशी जवळीक वाढल्यानंतर तिने खरा रंग दाखवायला सुरूवात केली होती. महिलेने तिच्या मित्रासोबत मिळून तरूणाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिली. जर हा गुन्हा दाखल करायचा नसेल तर महिलेने तरूणाकडून पैशाची मागणी केली होती. अशाप्रकारे महिलेने खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन तरूणाकडून 19 लाख रूपये लूटले होते. इतके रूपये घेऊन देखील महिलेची पैशाची भूक वाढतच चालली होती. त्यामुळे तिने पुन्हा तरूणाला खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन त्याच्याकडे 7 लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र तरूणाने यावेळेस धमकीला न घाबरता थेट गोटन पोलीस ठाणे गाठले होते. तरूणाच्या या तक्रारीवरून पोलिसांनी माया आणि तिचा साथिदार मित्र अनिल ऊर्फ रामसुखला अटक करून कलम 387, 388, 420, 346 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

पीडित तरूणाच्या कुटुंबियांनी या प्रकरणी 9 ऑगस्टला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तरूणाने म्हटले की, माया नावाच्या महिलेसोबत माझी ओळख झाली होती. मायासोबत अनेक महिन्यांपासून माझं फोनवर बोलणे सुरु होते. यामुळे आमची चांगलीच मैत्री झाली होती. या मैत्रीतून आम्ही दोघे अनेकदा भेटायचो देखील. याच दरम्यान मायाने तिचा साथिदार अनिल ऊर्फ रामसुखसह मला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिली. या धमकीच्या नावाखाली तिने माझ्याकडून 19 लाख रूपये लूटले होते. यानंतर आणखीण 7 लाखाची मागणी केली होती, असे तरूणाने तक्रारीत सांगितले होते.

हे ही वाचा : सना खान हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! पतीबरोबर आणखी एकाचा सहभाग, कोण आहे तो?

पीडित तरूणाच्या या तक्रारीवरून पोलिसांनी माया आणि तिचा साथिदार मित्र अनिल ऊर्फ रामसुखला अटक करून कलम 387, 388, 420, 346 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT