वासनांध बायकोचं नवऱ्यासोबत भयंकर कृत्य.. नेमकं घडलं तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

husband murdered buried by putting salt on dead body sensational incident in extra marital affair
husband murdered buried by putting salt on dead body sensational incident in extra marital affair
social share
google news

पुरुलिया (पश्चिम बंगाल): विवाहबाह्य प्रेमसंबंधातून (immoral relationship) हत्येची (Murder) एक अशी घटना घडली आहे की, ज्यामुळे तुम्हाला धडकी भरेल. हत्येची भयंकर घटना ही पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये घडली आहे. एका 45 वर्षीय व्यक्तीने स्वप्नातही विचार केला नसेल की, ज्या पत्नीसोबत त्याने जन्मोजन्मी राहण्याची शपथ घेतली होती तीच एके दिवशी त्याचा घात करेल. (husband murdered buried by putting salt on dead body sensational incident in extra marital affair)

ADVERTISEMENT

हे प्रकरण 26 मार्च रोजीचे आहे. जेव्हा जुदन महतो (वय 45 वर्ष) नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. जुदनचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या मुलाने या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला. तपास सुरू असताना जुदनची पत्नी उत्तरा ही संशयाच्या भोवऱ्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यानंतर महिलेने सांगितलेली गोष्ट ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

‘प्रेमाच्या मार्गात नवरा होता अडसर’

महिलेने सांगितले की, तिचे जयपूरमधील शिलफोर्ड गावातील रहिवासी क्षेत्रपाल महतो याच्यासोबत प्रेमसंबंध होते. पण, पती जुदन हा त्यांच्या प्रेमात नेमका अडथळा ठरत होता. त्यामुळे आपल्या पतीला मार्गातून दूर करण्यासाठी उत्तराने प्रियकराशी हातमिळवणी करून त्याच्या हत्येचा कट रचला.

हा कट अशा भयंकर प्लॅनिंगने रचण्यात आला की जुदानच्या मुलालाही त्याचा सुगावा लागू शकला नाही. उत्तराचा प्रियकर क्षेत्रपाल याने हत्या धारदार शस्त्राने करावी असा सल्ला दिला. यावेळी त्याने प्रेयसी उत्तराला असंही सांगितलं की, पोलिसांना पुरावे मिळू नयेत आणि संशय येऊ नये म्हणून मृतदेहाचे दफन करून त्यावर मीठ टाकू. यामुळे हाडे देखील लवकर नष्ट होतील.

मृतदेह पुरून त्यावर टाकले मीठ

पोलिस अधीक्षक अभिजीत बॅनर्जी यांनी सांगितले की, कटाचा भाग म्हणून दोघांनी धारदार शस्त्राने जुदनची हत्या केली. त्यानंतर शौचालयाजवळ एक खड्डा करून त्यात जुदनचा मृतदेह पुरून त्यावर मीठ टाकले. यानंतर क्षेत्रपाल हा झारखंडला जाऊन लपला आणि प्रकरण थंड होण्याची वाट पाहू लागला.

ADVERTISEMENT

पोलीस आरोपींचा सतत शोध घेत होते, मात्र कोणतीही नेमकी माहिती मिळत नव्हते. अखेर आरोपी क्षेत्रपाल हा झारखंडमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर जयपूर पोलिसांनी तेथे पोहोचून त्याला अटक केली.

ADVERTISEMENT

जयपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की आरोपीला पुरुलिया जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. येथे न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT