विकृत नवरा.. बायकोचे बेडरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ केले शेअर, कारण…
Husband share wife private video : एका पतीने आपल्याच पत्नीचे बेडरूमच्या सीसीटीव्हीत कैद झालेले प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या प्रकरणी महिलेने आता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आरोपी पतीचा पोलिसांनी शोध सूरू केला आहे.
ADVERTISEMENT
Husband share wife private video : देशात एकीकडे लग्नसराई सुरु असताना दुसरीकडे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका पतीने (Husband) आपल्याच पत्नीचे बेडरूमच्या सीसीटीव्हीत कैद झालेले प्रायव्हेट (Private Video) व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या घटनेनंतर महिलेची बदनामी झाली आहे. या प्रकरणी महिलेने आता पोलिस (police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आरोपी पतीचा पोलिसांनी शोध सूरू केला आहे.(husband share wife bedroom private video on the internet madhya pradesh gwalior incident)
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
या घटनेतील आरोपी पतीचे वय 27 वर्ष आहे, तर पत्नीचे वय 25 वर्ष आहे. हे पती-पत्नी मछली मंडी परिसरात राहतात. दोघांचे दोन वर्षापुर्वीच लग्न झाले होते. या लग्नात मुलीकडच्यांनी मुलांना बुलेट बाईक दिली होती. या लग्नानंतर दोघांचा संसार खुप चांगला सुरु होता. मात्र लग्नाच्या सहा महिन्यानंतरच दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली होती. या वादाच कारण ठरली होती बुलेट बाईक.
हे ही वाचा : किरकोळ कारणावरून 9वर्षीय इन्स्टा क्वीनची गळफास लावून आत्महत्या
खरं तर लग्नात नवऱ्याकडच्यांकडून लग्नात कारची मागणी करण्यात आली होती. मात्र कार देण्यास मुलीकडच्यांनी नकार दिला होता. यावरून दोघा पती-पत्नीमध्ये (Husband-wife) खुप वाद झाला. पतीने पत्नीला मारहाण देखील केली होती. या मारहाणीनंतर पत्नी घर सोडून माहेरी गेली होती. माहेरी जाऊन पत्नीने पतीविरोधात घरगूती हिंसाचार प्रकरणी (Domestic Voilence Act 2005) तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीची चौकशी केली होती.
प्रायव्हेट व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल
पतीने (Husband) तक्रार मागे घेण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला होता. पण पत्नीने (Wife) ज्यावेळेस त्याला नकार दिला त्यावेळेस पतीने पत्नीचे बेडरूममधले सर्व प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. मात्र पत्नीने तक्रार मागे न घेतल्याने त्याने पतीने पत्नीचे बेडरूममधले सर्व प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले होते. इतकेच नाही तर स्वताच्या व्हाट्सअप स्टेटसवर देखील ठेवले होते.
हे ही वाचा : ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी पिता-पुत्र गेले तुरुंगात, ती आली परत; मग सापडलेला मृतदेह कुणाचा?
पत्नीला (Wife) या घटनेची कल्पनाच नव्हती.मात्र तिच्या जवळच्या मैत्रिणीने ज्यावेळेस सोशल मीडियावर प्रायव्हेट व्हिडिओ पाहिले, त्यावेळेस त्यांनी तिला या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर महिलेने सायबर क्राईममध्ये दुसरी तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा शोध सूरू केला आहे.
ADVERTISEMENT
मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) ग्वालियरमध्ये ही घटना घडली. ही घटना वाचून नागरीकांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT