Crime:हातोडीनं वार,रिक्षात बसवून नदीत…,तीन मेहूण्यांनी मिळून दाजींची हत्या का केली?
कल्याणमधून (Kalyan) एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला होता.याच वादातून तीन मेहूण्यानी मिळून दाजींची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
कल्याणमधून (Kalyan) एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला होता.याच वादातून तीन मेहूण्यानी मिळून दाजींची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) इरशाद शेख, सोयब शेख, हेमंत बिचवाडे या तिघांना ताब्यात घेतले आहे.तसेच नदीत मृतदेहाचा देखील शोध घेतला जात आहे. (husband wife fight three brothers-in-law kill wife husbnd kalyan crime story)
पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव शेहबाज शेख (26) असे आहे. शेहबाज हा टिटवाळा नजीक बल्याणी गावात राहायचे तर त्याची दुसरी पत्नी मुमताज शहाड भागातील बंदरपाडा परिसरात राहते. मुमताज हिचा आदी निकाह झाला असून तिला पहिल्या पतीपासून तीन मुलं आहेत. तर मृतक शेहबाज हा तिचा दुसरा पती होता, आणि गेल्या साडे चार वर्षापासून दोघे संसार करत होते. मृत शेहबाजपासून मुमताजला दोन मुलं आहेत. शुक्रवारी सायंकाळी शेहबाज मुमताजच्या घरी मुलांना घ्यायला आला होता. मात्र मुमताजने मुले नेण्यास विरोध केल्याने पती पत्नीमध्ये वाद झाला होता.
हे ही वाचा : Crime: सामूहिक बलात्कार, कोळशाच्या भट्टीत फेकलं…अल्पवयीन मुलीसोबत घडली भयंकर घटना
या वादातून तीन मेहूण्यांनी दाजी शेहबाजवर हातोडीन वार करून त्यांना जखमी केले. याच जखमी अवस्थेत त्यांना बाहेर खेचून नेत रिक्षात जबरदस्ती बसवले. त्यानंतर कल्याण मुरबाड रोडवरील पांजरपोळ नजीक नदी त्यांना फेकून दिल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शुक्रवारी रात्री 10 सुमारास मुमताज ही पती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात आली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेहबाज बेपत्ता असल्याची नोंद करून तपास सुरू केला होता. याच दरम्यान पोलिसांना तीन मेहुण्यानी मिळून दाजीला बेदम मारहाण केल्याची माहिती मिळाली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास तीनही मेहूण्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, तिघांनी मारहाण केल्याची कबूली दिली.तसेज दाजी शेहबाजला कल्याण मुरबाड रोडवरील पांजरपोळ नजीक नदीत फेकल्याची माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने नदी पात्रात आज सकाळपासून शेहबाजचा शोध सुरू केला होता. मात्र शेहबाजचा थांगपत्ता लागला नसून नदी पात्रात शोधकार्य सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली.
दरम्यान खडकपाडा पोलिसांनी इरशाद शेख, सोयब शेख, हेमंत बिचवाडे या तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेली रीक्षा देखील ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करक आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नितीन देसाई आत्महत्याप्रकरणात मुलीचा खळबळजनक आरोप, ”कंपनीची खोटी आश्वासन, फसवणूक…
ADVERTISEMENT