Crime : शेती करताना मालकासोबतच जुळले सूत, वहिनीच्या विवाहबाह्य संबंधामुळे दिराचा गेला जीव

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

immoral relationship sister in law along with boyfriend murder husband brother bhilwada rajsthan crime story
immoral relationship sister in law along with boyfriend murder husband brother bhilwada rajsthan crime story
social share
google news

देशात अनैतिक संबंधाच्या (immoral relationship) घटना वाढत चालल्या आहेत.या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका दिराला वहिनीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली होती. त्यामुळे आपलं पितळ उघडं पडण्याच्या भितीने वहिनीने प्रियकरासह मिळून कट रचून दिराची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर अटकेच्या भितीने दिराचा मृतदेह नदीपात्रात फेकण्यात आला होता. आता या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. (immoral relationship sister in law along with boyfriend murder husband brother bhilwada rajsthan crime story)

ADVERTISEMENT

राजस्थानच्या (Rajasthan) भिलवाडा (Bhilwada) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेत हनुमान नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबरला धुवाला गावातील बनास नदीत एका अज्ञात तरूणाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. या मृत तरूणाचे नाव गणेश माली असे असून तो डिग्गीचा रहिवाशी होता.

हे ही वाचा : Manoj Jarange : ‘नागपूरच्या कोतवालाकडे जरांगेंचे प्राण…’, फडणवीसांवर सेनेचा UBT घणाघात

पोलिसांना मृतदेहावर जखमेचे निशाण आढळले होते. तसेच मृतदेहाचे हात देखील बांधले गेले होते. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. तसचे मृतांच्या कुटुंबियांनी देखील गणेश मालीच्या मृत्यूवर हत्येचा संशय व्यक्त केला होता. या संशयानंतर पोलिसांनीच कुटुंबियाचीच चौकशी करायला सुरुवात केली होती. या चौकशी दरम्यान पोलिसांना गणेशची वहिनी नोरता मालीवर संशय बळावला. या संशयातून पोलिसांनी वहिनीची कसून चौकशी केली असता तिने दिराच्या हत्येचा उलगडा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीर गणेशची वहिनी नोरता माली ही शेजारीच राहणाऱ्या धनराज सिंह राजपूतच्या शेतात मजूरी करायला जायची. या दरम्यान दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले होते आणि अनैतिक संबंधाला सुरूवात झाली. साधारण 5 महिन्यापासून नोरता आणि धनराजमध्ये अनैतिक संबंध सुरू होते. या अनैतिक संबंधाची माहिती दिर गणेश मालीला मिळाली होती. त्यामुळे आपलं पितळं उघड होण्याची भितीने नोरता आणि तिच्या प्रियकराने गणेशच्या हत्येचा कट रचला.

हे ही वाचा : नीलम गोऱ्हेंनी पुण्यात केला होता दंगल घडवण्याचा प्रयत्न, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप

त्यानुसार 16-17 ऑक्टोबरच्या मध्यरात्री वहिनी नोरती आणि तिच्या प्रियकराने मिळून गणेशला मारहाण करायला सुरुवात केली होती. या मारहाणीनंतर गणेश बेशुद्ध पडला होता. मात्र वहिनी आणि तिच्या प्रियकराला त्याची हत्या झाल्याचे वाटले. त्यामुळे दोघांनी मिळून त्याचे हात-पाय बांधत कारमधून मृतदेह नेत नदिपात्रात टाकला होता. त्यामुळे नदिपात्रात बुडुन त्याचा मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

दरम्यान आता या हत्या प्रकरणात वहिनी नोरता माली आणि तिच्या प्रियकर धनराजला अटक करण्याला आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT