टक्कल केलं, सिगारेटने जाळलं अन् निर्वस्त्र… अकोल्यात वासनांध तरूणाचे 14 वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य!
अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नात आरोपी तरुणाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.
ADVERTISEMENT
Maharashtra Crime Case: अकोल्यात (Akola) एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नात आरोपी तरुणाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपीने आधी मुलीचा हात सिगारेटने जाळला आणि नंतर तिचे टक्कल करत स्मशानभूमीत निर्वस्त्र करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, ही घटना 15 नोव्हेंबर 2023 रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. (In Akola Shaved head burned with cigarettes and stripped molestation with 14-year-old minor girl cause she said no to rape)
ADVERTISEMENT
14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
सामाजिक संस्थेच्या लोकांना ही घटना कळताच त्यांनी मुलीच्या वडिलांशी बोलून पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. त्याला 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, आरोपीने त्यांच्या घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती.
वाचा : Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भुजबळांच्या मागे फडणवीस आहेत का?
मुलीने विरोध करताच तिच्यासोबत अमानुष कृत्य
ही घटना खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैलास टेकडी परिसरात घडली. जिथे आरोपी तरूण एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवण्याचा प्रयत्न करत होता. मुलीने त्याला विरोध सुरू केल्यावर त्याने क्रूर वर्तन करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर पीडितेचे कुटुंब प्रचंड घाबरले आहे.
हे वाचलं का?
वाचा : Maharashtra Kesari: शिवराज राक्षे ठरला डबल महाराष्ट्र केसरी, जिंकली ‘ही’ गाडी
न्यायालयाने आरोपीला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
न्यायालयाने आरोपी गनी उर्फ गणेश याला 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, आरोपी अनेकदा त्यांची मुलगी आणि पत्नीला त्रास देत होता. तिने विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT