RPF Constable : “मला कसाबच आठवला”, प्रत्यक्षदर्शीचा थरकाप उडवणारा अनुभव
जयपूरहून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये सोमवारी (31 जुलै) एएसआय आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या कॉन्स्टेबल चेतनची चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
Jaipur express firing news in Marathi : जयपूरहून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये सोमवारी (31 जुलै) एएसआय आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या कॉन्स्टेबल चेतनची चौकशी सुरू आहे. दरम्यान, रेल्वे गोळीबारातील प्रत्यक्षदर्शींनी गोळीबाराच्या घटनेच्या दिवशी काय घडलं, याचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला. कॉन्स्टेबल चेतनला गोळीबार करताना बघून मुंबई हल्ल्यातील दहशतवादी कसाबची आठवण झाली, असं प्रत्यक्षदर्शींने सांगितलं. (The interrogation of constable Chetan, who shot dead ASI and three passengers on Monday in a train going from Jaipur to Mumbai, is going on)
सांगायचं म्हणजे सोमवारी (31 जुलै) जयपूरहून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये गोळीबार झाला होता. आरोपी हवालदार चेतनने त्याचा वरिष्ठ एएसआय टिकाराम आणि इतर तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने ट्रेनमधून उडी मारली. मात्र, त्याला मिरा रोड येथे अटक करण्यात आली.
ते सगळं भयानक स्वप्नासारखंच होतं -प्रत्यक्षदर्शी
गोळीबाराच्या वेळी ट्रेन अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला हे देखील जयपूर एक्स्प्रेसमध्ये होते. त्यांनी सांगितले की ‘मला कसाबने हल्ला केल्यानंतर जी परिस्थिती झाली होती, त्याचीच आठवण झाली. त्याच्या (चेतन) हातात बंदूक होती आणि तो कसाब सारखंच करत होता. कृष्ण कुमार शुक्ला यांनी सांगितले की, ते 12 वर्षांपासून ट्रेन अटेंडंट आहेत. तो प्रसंग भयानक होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> RPF Constable : “मनोरुग्ण निवडून माणसं मारतो का?”, जितेंद्र आव्हाडांचा चढला पारा
शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार ते ट्रेनच्या B5 बोगीत होते. तेवढ्यात त्यांना गोळीबाराचा आवाज आला. सुरुवातीला तो गोळीचा आवाज आहे असे वाटले नाही. त्यानंतर एएसआय टिकाराम मीना हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तर आरोपी (चेतन सिंग) काही मिनिटे मृतदेहाकडे बघत उभा होता. त्यानंतर सर्व प्रवासी घाबरले. त्यानंतर प्रवाशांनी B5 बोगी बंद केली, जेणेकरून कोणीही त्यात प्रवेश करू नये आणि कोणी बाहेर जाऊ नये.
चेतन बराच वेळ बघत होता मृतदेह
शुक्ला यांनी सांगितले की, काही वेळाने आरोपी पुन्हा टिकारामच्या मृतदेहाजवळ आला आणि तिथे उभा राहिला आणि त्याच्याकडे पाहू लागला. मात्र, तो काहीच बोलला नाही. तो फक्त मृतदेहाकडे एकटक पाहत होता. काही मिनिटांनी तो तेथून निघून गेला. कृष्णकुमार यांनी सांगितले की, बोरिवली स्थानकावर जीआरपीचे जवान ट्रेनमध्ये आले, तेव्हाच तो बोगीतून बाहेर पडला. ट्रेन अटेंडंट कृष्ण कुमार यांनी सांगितले की, त्यांनी बोरिवलीमध्ये इतर मृतदेह पाहिले. ती अत्यंत भयावह घटना होती. या घटनेनंतर त्यांना झोपच येत नव्हती.
ADVERTISEMENT
चेतनने प्रवाशाला गोळी मारण्यापूर्वी नेले पॅन्ट्री कारमध्ये
चेतनने बंदुकीचा धाक दाखवत एका प्रवाशाला बी2 बोगीतून पॅन्ट्री कारमध्ये नेले. चेतनने याच प्रवाशाला गोळ्या घालून ठार केले. पँट्री कार B2 बोगीच्या 2 बोगी पुढे होता.
ADVERTISEMENT
प्रवाशांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू
वृत्तसंस्थेनुसार, जीआरपी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कॉन्स्टेबल चेतन सिंहने ट्रेनच्या बी-2 कोचमध्ये प्रवास करत असलेल्या सय्यद एस यांना बंदुकीच्या जोरावर पॅन्ट्री कारकडे जाण्यास भाग पाडले. येथे आल्यानंतर चेतनने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. चेतन सय्यदला पँट्री कारमध्ये घेऊन जात असताना बाकीचे प्रवासी त्याच्याकडे पाहतच राहिले.
वाचा >> नितीन देसाईंनी ND स्टुडिओमध्येच का संपवलं आयुष्य, ‘ते’ प्रकरण काय?
जीआरपी पोलीस ट्रेनच्या बोगी 5 मधील प्रवाशांची माहिती गोळा करत आहे, जे गोळीबारावेळी ट्रेनमध्ये होते. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत किमान डझनभर प्रवाशांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपी चेतनची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मात्र, या हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे इतर प्रवाशांकडून माहिती घेतली जात आहे. त्यांनी सांगितले की, गोळीबारानंतर अनेक प्रवासी मुंबई सेंट्रलच्या आधी बोरिवली स्थानकावरच उतरले.
अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (वय 58, रा. पालघर) आणि असगर अब्बास शेख (वय 48, रा. बिहारमधील मधुबनी) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. तर तिसऱ्या प्रवाशाचे नाव सय्यद एस (वय 43) असे आहे.
ADVERTISEMENT