Kolhapur News : रिक्षातून आले अन् तलवारी उपसल्या; सपासप 18 वार करत…
पदाधिकाऱ्यांचा मशीदीतील आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता. मशीदीत सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारात गफलत झाल्याच्या भावनेनं या कमिटीत कार्यरत असणार्या मेहमुद पठाण यांनी अझर फकीर यांच्याकडं हिशोबाची मागणी केली होती.
ADVERTISEMENT
Kolhapur Crime News : कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका गटाने तलवारीचे 18 सपासप वार करून एका मशीदीच्या प्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. मेहमुद पठाण (वय 52) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित व्यक्ती आणि आरोपीमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद सुरु होता. या वादातूनच हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या हल्यानंतर स्थानिकांनी मेहमुद पठाण यांना रूग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदर बाजार चौकातील मशीद परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (kolhapur crime news sword attack sadar bazar mosque financial dispute one injured shocking crime news)
ADVERTISEMENT
कोल्हापुर शहरातील सदर बाजार चौकात मशीद आहे. या मशीद परिसरातील मुस्लीम समाजातील अनेकजण पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यांचा मशीदीतील आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता. मशीदीत सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारात गफलत झाल्याच्या भावनेनं या कमिटीत कार्यरत असणार्या मेहमुद पठाण यांनी अझर फकीर यांच्याकडं हिशोबाची मागणी केली होती. त्यातून गेल्या आठवडयापासून त्यांच्यात वाद देखीस झाला होता.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : “पृथ्वीराज चव्हाण धडधडीत खोटं बोलताहेत “, ‘वंचित’ भडकली
या वादातूनच अझर फकीरने मेहमूद पठाणवर हल्ल्याचा कट रचला होता. त्यानुसार अझर फकीर हा मशीदीच्या समोरील रस्त्यावर एका रिक्षात सहकार्यांसोबत बसून मेहमूदची वाट पाहत होता. यावेळी बाईकवरून मशीदीत प्रार्थना करण्यासाठी मेहमुद पठाण आले असता त्यांच्यावर अझर आणि त्याच्या सहकऱ्यांनी थेट तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात तलवारीचे तब्बल 18 सपासप वार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. शनिवारी 13 जानेवारीच्या दुपारी ही घटना घडली होती. या हल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते. यावेळी स्थानिकांनी मेहमूद यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे.
हे वाचलं का?
उपनिरिक्षक हर्षल बागल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर मुख्य संशयित अझर फकीर याला अटक केली आहे. जिल्हा न्यायालयानं 18 जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली. या हल्ल्याप्रकरणी आणखी काही संशयीतांचा शाहूपुरी पोलिसांकडून शोध सुरू आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतायत.
हे ही वाचा : Ram Mandir : फडणवीसांचा राऊंताना सणसणीत टोला, ‘मुर्खांना मी…’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT