मोठी बातमी: पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या अतिक-अशरफची गोळ्या झाडून हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद
अतिक अहमद आणि अशरफ यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी हे मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर बोलत असतानाच ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.’
ADVERTISEMENT
प्रयागराज: उत्तर प्रदेशमध्ये दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा चिंधड्या उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पोलिसांच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तीन तरुणांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींची अशी हत्या करण्यात आल्याने उत्तर प्रदेश संपूर्ण देश हादरून गेला आहे. (mafia atiq ahmed and his brother ashraf ahmed were shot dead while interacting with media in prayagraj)
ADVERTISEMENT
कशी झाली अतिक आणि अशरफची हत्या?
आरोपी अतिक आणि अशरफ यांना पोलीस आज (15 एप्रिल) वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. जेव्हा हे दोन्ही आरोपी समोर आले तेव्हा मीडियाच्या काही लोकांना त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबवलं. त्याचवेळी अचानक अतिक आणि अशरफ यांच्यावत तीन जणांनी बेछूट गोळीबार केला. ज्यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
Uttar Pradesh | Visuals from Prayagraj where Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed were shot dead. pic.twitter.com/vyzMk8GEir
— ANI (@ANI) April 15, 2023
मिळालेल्या माहितीनुसार अतिक अहमद आणि अशरफ यांची मेडिकल कॉलेजजवळ हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला झाला त्यावेळी दोघांना तपासणीसाठी नेले जात होते. पण गोळीबारात जागीच मृत्यू झालेल्या दोघांचेही मृतदेह आता मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहेत. दुसरीकडे प्रत्यक्षदर्शीच्या मते, जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी जय श्री रामचा नारा देखील ऐकू आला. आता पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
UP: Visuals from the spot where Mafia-turned-politician #AtiqAhmed and his brother Ashraf Ahmed were shot dead while interacting with media. pic.twitter.com/fOGaDrGBKz
— ANI (@ANI) April 15, 2023
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील कॉल्विन हॉस्पिटलजवळ पोलिसांचे पथक अतिक आणि अहमद यांना घेऊन जात असताना हा हल्ला झाला. दरम्यान, तीन हल्लेखोर अचानक तिथे पोहोचले आणि त्यांनी वेगाने गोळीबार सुरू केला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून तात्काळ हल्लेखोरांना ताब्यात घेतले. हा संपूर्ण हल्ला मीडिया आणि पोलिसांसमोर करण्यात आला आहे. दोघांवर गोळीबार झाला तेव्हाची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हल्ल्यात एक पोलीस हवालदारही जखमी झाला असून त्याचे नाव मान सिंह आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
अधिक वाचा- Abu salem : गँगस्टर अतिक- असदच्या कथेत अंडरवर्ल्ड डॉनची एंट्री; कोण आहे अबू सालेम?
मुख्यमंत्री योगींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
या घटनेनंतर प्रयागराज ते लखनौपर्यंत खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. सीएम योगी या घटनेमुळे संतापले असून या बैठकीत ते यूपी पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांकडून अहवाल मागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी डीजीपी आणि एडीजींना देखील बोलावले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सध्या कोणतेही वक्तव्य आलेले नाही. या घटनेबाबत लवकरच उच्च पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेऊ शकतात.
अधिक वाचा- ‘माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं’, कुख्यात माफिया अतिक अहमद असं का म्हणाला?
यादरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे सर्व हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, तर जय श्री रामचा नारा देत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी तीनही हल्लेखोरांची नावं आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची नाकेबंदी केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी अतिकच्या मुलगा असदचा पोलीस चकमकीत झालेला मृत्यू
याआधी गुरुवारी यूपी एसटीएफने अतीक अहमदचा मुलगा असद याला झाशी येथे पोलीस चकमकीत ठार केले होते. यासोबतच शूटर गुलामही ठार झाला होता. एसटीएफचे पथक गेल्या दीड महिन्यांपासून असद अहमद आणि गुलामचा शोध घेत होते. यूपी एसटीएफचे डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली ही चकमक झाली होती. असदवर पाच लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. असद आणि शूटर मोहम्मदकडे ब्रिटीश Bull Dog Revolver और Walhther Pistol जप्त करण्यात आले आहे.
अधिक वाचा- Crime : पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची केली हत्या
24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये उमेश पालची करण्यात आलेली हत्या
उमेश पाल आणि त्यांच्या दोन सुरक्षा कर्मचार्यांची 24 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. उमेश पाल हा प्रयागराज येथील राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होता. उमेश गाडीतून खाली उतरताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. यादरम्यान गोळी लागल्याने त्यांचा आणि त्यांच्या एका सुरक्ष रक्षकाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नराधमांनी अवघ्या 44 सेकंदात हे हत्याकांड घडवून आणले होते. या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा अतिक होता ज्याच्यावर या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. त्यामुळेच पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, आता पोलिसांच्या ताब्यात असतानाही दोघांची हत्या झाल्याने यूपी सरकार आणि पोलीस प्रशासन यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT