आईस्क्रिम खायला गेली अन् गर्भवतीचा मृत्यू, रात्रभर आईच्या मृतदेहाला बिलगलेला चिमुकला

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Maharashtra News Pregnant Woman Died after Fall from Bridge in Chandrapur
Maharashtra News Pregnant Woman Died after Fall from Bridge in Chandrapur
social share
google news

Maharashtra News : चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेचा वेदनादायक मृत्यू झाला. बामणी-राजुरा रस्त्यावरील वर्धा नदीवरील पुलावरून ती आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह स्कूटरवरून जात होती. यावेळी पुलावर, स्कूटरचा तोल गेला आणि महिला स्कूटरसह मुलासोबत 30 फूट खाली पडली. यात महिलेचा मृत्यू झाला. जखमी चार वर्षांचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाला बिलगून रडत राहिला. (Maharashtra News Pregnant Woman Died after Fall from Bridge in Chandrapur)

ADVERTISEMENT

कुटुंबीयांनी महिलेची माहिती पोलिसांना दिली होती. बुधवारी (18 ऑक्टोबर) रात्रभर पोलिसांनी (Chandrapur Police) शोधमोहीम राबवली. गुरुवारी (19 ऑक्टोबर) सकाळी वर्धा नदीच्या काठावरील पुलाखाली महिलेचा मृतदेह पडलेला आढळून आला. याशिवाय एक चार वर्षाचा मुलगाही जखमी अवस्थेत तिथे होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि जखमी मुलालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

वाचा: एक नाव, दोन व्होट बँक; प्रमोद महाजन यांच्या नावाने योजना सुरू करण्याचे कारण काय?

महिला मुलासह आइस्क्रीम घ्यायला पडली होती बाहेर!

बुधवारी सायंकाळी 7 वाजता आदित्य प्लाझा बामणी येथे राहणारी सुषमा पवन काकडे ही मृत महिला आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्यासाठी आइस्क्रीम आणायला जाते सांगून स्कूटरवरून निघाली. सुषमाही तीन महिन्यांची गर्भवती होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बामणीहून राजुरा येथे जात असताना स्कूटरचा तोल गेला. सुषमा आपल्या मुलासह स्कूटरवरून वर्धा नदीवरील पुलावरून 30 फूट खाली पडली. यात गंभीर जखमी झालेल्या सुषमाचा जागीच मृत्यू झाला. अंधारामुळे त्यांच्याकडे कोणाचे लक्षही गेले नाही. सुषमा यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला.

वाचा: Cyclone: 2 चक्रीवादळं कुठे धडकणार, ‘तेज’ चक्रीवादळ येणार मुंबईच्या दिशेने?

कुटुंबीयांनी केला गुन्हा दाखल

सुषमा घरी न परतल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत पडले. कॉल कनेक्ट होत नव्हता. बल्लारपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी उमेश पाटील यांनी सांगितले की, बुधवार-गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात महिला व मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद केली.

ADVERTISEMENT

पतीला सुषमाचे शेवटचे लोकेशन ईमेलद्वारे कळले

सुषमाचे पती पवन काकडे हे बँकेत कर्मचारी आहेत. पत्नी सुषमा मुलासाठी आइस्क्रीमघेत देवीच्या दर्शनासाठी बामणी गावात जाणार असल्याचं सांगून घरातून निघाली होती. असे त्याने पोलिसांना सांगितलं. यावेळी पवनला सुषमाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ईमेलद्वारे कळले जे वर्धा नदीजवळ बामणी राजुरा मार्गावर होते.

ADVERTISEMENT

वाचा: Vitthal Mandir: पत्राच्या घरात राहणाऱ्या महिलेने दान केले तब्बल 18 लाखांचे दागिने, कारण…

मुलाच्या रडण्याचा आवाज पोलिसांना आला

पहाटे चारच्या सुमारास पोलीस पथकासह कुटुंबीय वर्धा नदीवर पोहोचले. चौकशी केली पण काही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी सखोल शोधमोहीम राबवली. यावेळी पुलाखालून एका मुलाच्या रडण्याचा आवाज आला. ते जवळ गेले असता नदीच्या काठावर सुषमा यांचा मृतदेह पडलेला दिसला. आईच्या मृतदेहाशेजारी चार वर्षाचा मुलगा रडत होता. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.पोलिसांनी सुषमाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. उंचीवरून पडल्यामुळे सुषमा यांची मान मोडली आणि हातही फ्रॅक्चर झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं.

बल्लारपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी उमेश पाटील यांनी सांगितले की, ‘सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुषमा आपल्या मुलासाठी आइस्क्रीम घेण्यासाठी घरापासून ५ किमी दूर का गेल्या होत्या, याचाही शोध घेतला जात आहे. प्रत्येक कोनातून तपास केला जात आहे.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT