Marine Drive : वसतिगृहात ‘त्या’ खोलीत विद्यार्थिनीसोबत घडलं तरी काय?, Inside Story
Marine Drive Murder Case: मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहात 19 वर्षीय तरुणीच्या हत्येचं गूढ आता उकलंल आहे. जाणून घ्या काय आहे या प्रकरणातील इनसाइड स्टोरी
ADVERTISEMENT
Marine Drive Murder Case: मुंबई: मरीन ड्राईव्ह वसतिगृहातील तरुणीच्या हत्येप्रकरणी (Marine Drive Hostel Murder) आता नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता याचबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. त्यानुसार, आरोपी ओमप्रकाश कनोजिया (om prakash kanojia) याने लेगिन्सने गळा आवळून तरुणीची निर्घृणपणे हत्या केल्याचं आता समोर आलं आहे. पण मुलींच्या वसतिगृहात आरोपी कनोजिया याचा मुक्त वावर कसा होता? त्याला एवढी मुभा दिलीच कोणी होती? यासारखे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. (marine drive hostel murder 19 year old female student inside story mumbai police crime akola)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कनोजिया हा धोब्याचं काम करायचा. पण त्यालाच कंत्राटी पद्धतीने वसतिगृह प्रशासनाने सुरक्षा रक्षक म्हणून देखील नेमल्याचं आता समोर आलं आहे. सुरुवातीला ओमप्रकाश हा वसतिगृहातील मुलींची बरीच कामं करून द्यायचा. त्यामुळे येथील मुलींचा विश्वास त्याने कमावला होता. पण यामागे त्यांच्या मनात काळबेरं होतं.
हे ही वाचा>> Mira Road Murder : लिव्ह इन पार्टनरचे लाकूड कापायच्या मशीनने केले तुकडे
5 जून रोजी वसतिगृहातील 4 चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या तरुणीच्या हत्येची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा अवघा महाराष्ट्र हादरून गेला. कारण मरीन ड्राईव्हसारखा उच्चभ्रू परिसर हा अतिशय सुरक्षित समजला जातो. मात्र, याच ठिकाणी असलेल्या वसतिगृहात 19 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याने पोलीस प्रशासन देखील हादरलं आहे.
लेगिन्सने आवळला गळा अन्..
वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर तरुणी ही गेल्या काही दिवसांपासून एकटीच राहत होती. या मजल्यावर असलेल्या इतर खोल्या या रिकाम्याच होत्या. त्यामुळे तरुणी ही एकटीच चौथ्या मजल्यावर राहत होती. तिला तिच्या इतर मैत्रिणींनी त्यांच्या खोलीत येऊन राहावं असंही सुचवलं होतं. पण आपलं वसतिगृह सुरक्षित आहे. तिथे आपल्या जीवाला फार काही धोका नाही असं म्हणत तरुणीने चौथ्याच मजल्यावर एकटीने राहणं पसंत केलं. पण इथेच तिचा घात झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी कनोजिया याची तरुणीवर वाईट नजर होती. अखेर सोमवारी रात्रीच्या सुमारास सर्वांची नजर चुकवून कनोजिया हा तरुणीच्या रुममध्ये शिरला. चौथा मजला असल्याने वर काय चाललं आहे याचा कुणालाचा अंदाज आला नाही. त्यामुळे वासनांध कनोजियाने थेट तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने कनोजियाला बराच विरोध केला. पण तिने कोणताही विरोध करू नये यासाठी कनोजियाने जवळच असलेल्या लेगिन्सने तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Mira Road Murder: तीन बकेट रक्त… प्रेयसीचे तुकडे कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरमध्ये वाटले
यानंतर नराधम कनोजिया हा स्वत: वसतिगृहाबाहेर पडला. स्वत: केलेल्या निर्घृण कृत्याची त्याला जाणीव झाली. त्यामुळे त्याने लोकल ट्रेनखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
सुरक्षारक्षक कनोजिया सतत द्यायचा त्रास
या घटनेनंतर वसतिगृहातील मुलींमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे. कारण ज्या कनोजियाने 19 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करुन तिची हत्या केली तो याआधी तरुणीला त्रास देत असल्याचं आता समोर आलं आहे. याबाबत तरुणी आणि तिच्या मैत्रिणीने वसतिगृहाच्या अधिक्षकांकडे तक्रार केल्याचंही सांगण्यात आहे. मात्र, अधिक्षकाने अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचं आता म्हटलं आहे.
कनोजियाची नेमणूक कोणी केली होती?
मिळालेल्या माहितीनुसार, कनोजिया हा शासकीय नियुक्तीवरील सुरक्षारक्षक नव्हता. तो कंत्राटी पद्धतीने तिथे कामावर रुजू झाल्याचं समजतं आहे. आता कनोजियाची अशी नेमणूक कोणी आणि का केली होती? हा महत्त्वाचा सवाल उपस्थित केला जात आहे. तसंच महिलांच्या वसतिगृहात एका पुरुषाला एवढ्या मुक्तपणे वावर करण्याची मुभा कोणी दिली होती? यासारखे अनेक सवाल या निमित्ताने विचारले जात आहेत. या सगळ्याचा आता मरीन ड्राईव्ह पोलीस कसून तपास करत आहेत. तसंच मृत आरोपी कनोजियासोबत आणखी कोणी या प्रकरणात गुतंलेलं होतं का? याचाही पोलीस शोध घेत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT